शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर 'त्या' मृतदेहाची तीन दिवसानंतर ओळख पटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2022 17:27 IST

नेमके एका ठिकाणी त्याने आजपर्यंत काम केलेले नसल्याचे समजले आहे. त्यामुळे परिवारातील सदस्यांना त्याची काम करण्याचे नेमके ठिकाण माहीत नव्हते.

पालांदूर (भंडारा) : रोजगाराच्या निमित्ताने सुमारे २० वर्षापासून घराबाहेर राहणाऱ्या एका तरुण ट्रक चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १६ एप्रिल ला यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील ग्रामीण रुग्णालयात घडली. मात्र ग्रामीण रुग्णालयात त्याची ओळख न पटल्याने मृतदेहाची शवविच्छेदना नंतर अंत्यविधी करण्यात आली. प्रकाश बुधाजी खंडाईत (३५, रा. पालांदूर, ता. लाखनी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

प्रकाश हा बऱ्याच वर्षापासून ट्रक चालक म्हणून काम करीत होता. घराबाहेर पडलेला प्रकाश वर्षातून काही वेळा राहत्या गावी पालांदूरला येत असे. परिवारातील सदस्यांशी, मित्रमंडळीशी भेट झाली की, पून्हा तो कामाच्या शोधात जात असे. नेमके एका ठिकाणी त्याने आजपर्यंत काम केलेले नसल्याचे समजले आहे. त्यामुळे परिवारातील सदस्यांना त्याची काम करण्याचे नेमके ठिकाण माहीत नव्हते.

मृत्यूच्या काही दिवसापूर्वी वणी परिसरात सिमेंटच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होता. अचानक प्रकाशची प्रकृती बिघडल्याने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात त्याने चिट्ठी काढून उपचार घेतले. त्यावेळेस त्याच्या सोबत कोणीच नव्हते.उपचारानंतर रुग्णालयातील परिसरातच तो चक्कर येऊन पडला. काही वेळ तो तिथेच पडून राहिला. शेजारपाजारचे यांनी त्याला उचलून पुन्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

ग्रामीण रुग्णालयातील नाव नोंदणीच्या वेळी प्रकाश बुधाजी खंडारे राहणार वणी असे नाव नोंद करण्यात आल्याने मृत्युनंतर त्याचा शोध घेण्याकरिता वणी पोलिसांना व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना यश आले नाही. तीन दिवसानंतर शव विच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर प्रकाशचे भाऊ कैलाश खंडाईत पालांदूर हे दवाखान्यात पोहोचले. मात्र तोपर्यंत सर्व प्रक्रिया आटोपलेली होती.

प्रकाशच्या मृत्यूची बातमी पालांदूर येथे पोहोचताच उलटसुलट चर्चांना पेव फुटला. ट्रक चालक असल्याने आपसातील भांडणामुळे किंवा त्याच्याकडे रोख रकमेमुळे घातपात घडवून आणला असावा असा कयास बांधला जात होता. मात्र प्रकाश चा भाऊ कैलाश यांनी स्वतः वणी येथे रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून शवविच्छेदन अहवालानुसार हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू