शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जमावाने मारहाण केलेल्या 'त्या' हल्लेखोराचाही मृत्यू; घटनेला गंभीर वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 16:28 IST

लस्सी सेंटर चालक युवकाच्या हत्येनंतर भंडाऱ्यात प्रचंड खळबळ

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : शहरातील गांधी चौकात दुर्गा लस्सी नावाने व्यवसाय करणाऱ्या अमन नंदुरकर नामक 23 वर्षीय युवकाची रविवारी रात्री 10.15 वाजताच्या दरम्यान पोटात चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर जमावाने अभिषेक साठवणे या 18 वर्षीय युवकाला पकडून बेदम मारहाण केली. त्याला रात्रीच नागपूरला उपचारासाठी पाठविले होते. त्याचाही मृत्यू झाल्याने या घटनेला गंभीर वळण लागले आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांविरूद्ध गुन्हे दाखल केले असून अमनच्या हत्येत सहभागी असलेल्या विक्की मोगरे आणि विष्णू उर्फ बा नामक दोन तरूणांना अटक केली आहे. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

रविवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास गांधी चौकात ही घटना घडली होती. आदल्या दिवशी शनिवारी अमनच्या स्टॉलसमोर विक्की मोगरे आणि विष्णू उर्फ बा नामक दोन तरूणांचा वाद झाला होता. या वादात होता. अमन नंदुरकर यालाही मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर अमनच्या काकाने स्टॉल बंद करून अमनला घरी पाठविले होते. हे प्रकरण तिथेच थांबले असताना रविवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास अभिषेक साठवणे आणि इतर तीन ते चार युवक अमनच्या लस्सी सेंटर असलेल्या स्टॉलजवळ आले.

कालच्या भांडणाबद्दल कॉम्प्रमाईज करायचे आहे, असे सांगून त्यांची चर्चा सुरू झाली. मात्र समेट न होता उलट भांडण बरेच वाढत गेले. या भांडणातच अभिषेकने आपल्या जवळील चाकू काढला आणि अमनच्या पोटातच भोसकला. यामुळे तो रक्तबंबाळ होऊन पडला. ही घटना घडल्यावर अमनचे काका, वडील, मित्रांनी आणि परिसरातील अन्य नागरिकांनी धाव घेतली आणि अभिषेकला पकडले. या दरम्यान काहींनी अभिषेकला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. 

भंडारा : लस्सी सेंटर चालक युवकाची भर चौकात पोटात चाकू भोसकून हत्या

नागरिकांनी आणि नातेवाईकांनी अमनला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळे अभिषेकलाही रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. अमनच्या मृत्यूची बातमी कळताच, जमावाने रुग्णालयातच अभिषेकला पुन्हा लाथाबुक्क्यांनी बडवून काढले. यामुळे तो गंभीर जखमी झाल्याने पोलिसांच्या बंदोबस्तात त्याला नागपूरला उपचारासाठी रवाना करण्यात आले. मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे बराच तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने सीअआपीएफच्या तुकडीला रात्रीच पाचारण करून चौकात बंदोबस्त लावला होता. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधिक्षक लोहित मतानी यांनी भेट देऊन पहाणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

गांधी चौक सुनसान

एरवि रोज सकाळी गजबजलेला असलेला गांधी चौक आज सोमवारी मात्र सुनसान होता. नागरिक टोळक्याटोळक्याने चर्चा करीत होते. पोलिसांचा बंदोबस्त दुपारनंतर मात्र या परिसरात दिसला नाही. सध्या परिस्थिती शांत आहे.

चौकात रस्ताचे थारोळे कायमच 

रात्री 10.15 वाजता घटना घडल्यानंतर गांधी चौकात अमनच्या रक्ताचे थारोळे कायमच होते. ते पाहुन अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. मात्र दुपार उलटूनही पोलिसांनी ती जागा धुण्याचा प्रयत्न केला नाही. येणारे-जाणारे यामुळे घटनास्थळी थबकून पहाताना दिसत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडारा