शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

६९ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:05 IST

बारमाही वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरात इंग्रजकालीन पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे शहरात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देसहा जलकुंभातून होणार भंडारा शहराला पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बारमाही वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरात इंग्रजकालीन पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे शहरात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ६९ कोटी ५५ लाख ९२ हजार रूपयांची पाणी पुरवठा योजनेच्या प्रारूपाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. आता नगर परिषदेने प्रशासकीय मान्यतेसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे पुढच्यावर्षी शहरवासियांना नियमित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.असा आहे मंजुरी आदेशमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता वी.बी. जगतारे यांनी जारी केलेल्या तांत्रिक मंजुरी आदेशानुसार ६९ कोटी ५५ लाख ९२ हजार रूपयांची पाणी पुरवठा योजना सुरू करण्यापूर्वी जलकुंभाची जागा निश्चित करणे गरजेचे असून भूसंपादन केल्यानंतर कामांना प्रारंभ होईल.शहराला मिळणार पाणीसद्यस्थितीत पाणी पुरवठा योजनेची क्षमता ९ एमएलटी इतकी असून जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून हुतात्मा स्मारक व कारागृह परिसरातील दोन जलकुंभातून शहरात पाणी पुरवठा होतो. आता प्रस्तावित योजनेची क्षमता २५ एमएलटी राहणार असून नवीन पाईपलाईन टाकण्यात येईल. शहराचे सहा झोनमध्ये वर्गिकरण करून आणखी चार जलकुंभ बनविण्यात येणार आहेत. हुतात्मा स्मारक परिसरात ५.९० लाख लिटर, भय्याजी नगरात ७.५० लाख लिटर, एमएसईबी कॉलनीत ४.५ लाख लिटर आणि पटवारी भवन परिसरात १२.२० लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ बनविण्याची योजना असून ही योजना अडीच वर्षात पूर्ण होईल.पाणी पुरवठा होता ज्वलंत मुद्दावैनगंगा नदी काठावर भंडारा शहर वसले असले तरी पाणी टंचाईचा मुद्दा गंभीर बनला होता. पाणी पुरवठ्याच्या नावावर आजवर कोट्यवधीचा निधी खर्च करण्यात येत होता. भूमिगत चेतन बंधारा बांधकामासाठी कर्ज घेण्यात आले होते. त्यानंतरही पाणी टंचाईचा प्रश्न मिटला नाही. सन २०११ मध्ये पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर झाला. परंतु काम समोर सरकले नाही. सन २०१७ मध्ये नगर परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. फेब्रुवारी महिन्यात नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी समारोहात आले असता त्यांनी पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीची घोषणा केली. तांत्रिक मंजुरी मिळाली आता प्रशासकीय मंजुरीची प्रतिक्षा आहे.प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षातांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर नगर परिषदेकडून प्रशासकिय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात प्रशासकिय मान्यता मिळताच कामाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. वैनगंगा नदीत नाग नदीचे प्रदूषित पाणी येत असून ही समस्या मार्गी लावण्यासाठी ओझोन प्लांटचा प्रस्ताव टाकण्यात येणार आहे.भंडारा शहरात पाणी पुरवठा योजनेसाठी आमदार डॉ.परिणय फुके, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे ही योजना मंजूर होऊ शकली. आता लवकरच प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. भंडारा शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असून प्रत्येक घरी पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- सुनिल मेंढे,नगराध्यक्ष भंडारा.