शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

'एक देश, एक विद्यार्थी ओळख' साठी शिक्षकांचा कस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 11:56 IST

Bhandara : अपार' मधून विद्यार्थ्यांना मिळणार ओळख

राजू बांते लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० नुसार देशाच्या एकूणच शैक्षणिक पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभ्यासक्रमातील बदलांपासून ते कार्यपद्धतीत बदलापर्यंतचा हा मोठाच पट आहे. यातीलच 'अपार' हा एक उपक्रम कार्यान्वित झाला आहे. 

तथापि, भंडारा जिल्ह्याचे अपार नोंदणीत केवळ ३५.२० टक्केच काम झाले आहे. याद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच डिजिलॉकरची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. 'एक देश, एक विद्यार्थी ओळख' या संकल्पनेच्या अंतर्गत हा उपक्रम आहे.

प्रत्येक विद्यार्थी वा विद्यार्थिनीची शैक्षणिक आणि शिक्षणेतर प्रगतीविषयक माहिती डिजिलॉकरमध्ये सुरक्षित करणे आणि या डिजिलॉकरसाठी स्वतःचा स्वतंत्र असा ओळख क्रमांक असणे, हा 'अपार'चा उद्देश आहे. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर लागणारी अधिकृत तसेच मूळ कागदपत्रे या व्यासपीठावर सहज उपलब्ध होणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांची शाळा बदलल्यास त्याला नव्या शाळेत सगळी कागदपत्रे जमा करण्याची गरज पडणार नाही.

डिजिलॉकर उपलब्ध असेल. एखाद्या कंपनीला नोकरी देताना उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हतेची खातरजमा करण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. शिक्षणासंदर्भातील अधिकृत कागदपत्रे हरविल्यास, मात्र 'अपार' आणि पर्यायाने डिजिलॉकर असल्यास त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर कुठलाही परिणाम होणार नाही. 

अशी आहे अपार नोंदणीची स्थितीजिल्ह्यातील शाळा- १,२९७ एकूण विद्यार्थी- १,९१,६३८ अपार रजिस्ट्रेशन- ६७,५७१

'अपार कार्ड' चा फायदा काय?विद्यार्थ्यांना हे कार्ड अधिक उपयुक्त ठरणार आहे. ते आधार कार्डशी जोडले जाणार आहे. यामध्ये पालकांच्या आधार क्रमांकाचाही समावेश करण्यात आला आहे. या कार्डमुळे सर्व शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.

'अपार' म्हणजे काय? 'ऑटोमेटेड पर्मनण्ट अकेडमिक अकाउंट रजिस्ट्री' म्हणजे 'अपार'. हा देशातील पूर्व प्राथमिक ते उच्चशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा बारा अंकी कायम स्वरूपी ओळख क्रमांक आहे.

नोकरीसाठीही फायदेशीर'अपार कार्ड'चा क्रमांक टाकल्यानंतर सर्व माहिती समोर येते. नोकरीसाठी विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. 

निवडणुकीचे काम, त्यात 'अपार' सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अनेक शिक्षकांची मतदार केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांचे प्रशिक्षणही झाले आहे. 'अपार'ची नोंदणी करताना शिक्षकांना अपार कष्ट करावे लागत आहे.

"विद्यार्थ्यांचे भविष्यातील हित लक्षात घेता शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अपार नोंदणीसाठी प्राधान्याने कार्य हाती घ्यावे. विद्यार्थ्यांना हे कार्ड अतिशय उपयुक्त ठरणार आहे." - रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद भंडारा

टॅग्स :bhandara-acभंडारा