भंडारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेदरम्यान प्रकृती बिघडल्याने शिक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना नुकतीच पवनारखारी येथे घडली. पवनी येथील सितकुरा महादेव कन्हाके (५०) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. मृतक हे तुमसर तालुक्यातील चिखली येथे शिक्षक होते. पवनारखारी येथे आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता ते विद्यार्थ्यांसह उपस्थित झाले होते. मात्र स्पर्धेदरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यामुळे त्यांना तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी मर्ग नोंदविला. तपास सहायक फौजदार कोचे करीत आहे.दागिने लांबविलेशहरातील खात रोडवरील माधव नगरातील दिलीप झिंजडे यांच्या घराच्या मागील दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह दीड हजार रूपये रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्मा करीत आहे.मारहाण प्रकरणी तक्रारशहरातील सुभाष वॉर्डातील अर्जुन महादेव सोनवाने आणि गणेश राजेंद्र सोनवाने यांच्यात नझुलच्या जागेवरून वाद निर्माण केला. यावेळी त्यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. वाद विकोपाला गेल्याने दोघांनिही परस्परांना मारहाण केली. याप्रकरणी दोघांच्याही तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी परस्परांविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कराडे व पोलीस हवालदार बावनकर करीत आहे.शेतातील धानाच्या ३१ पोत्यांची चोरीतुमसर तालुक्यातील गोंडीटोला येथील सहसलाल लक्ष्मण रहांगडाले यांनी धानाचे चुरने केले. ३१ पोत्यात भरलेले धान त्यांनी शेतातच ठेवले होते. संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोराने ४७ हजार २५० रूपये किंमतीचे धान पोते चोरून नेले. याप्रकरणी सिहोरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.दुचाकी चालकावर कारवाईमद्यप्राशन करून दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीला जिल्हा परिषद चौकात पोलिसांनी ब्रिथ अल्कोहल अॅनालायझरने तपासणी केले. यावेळी तो मद्यप्राशन करून असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरूध्द भंडारा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.दारू अड्ड्यांवर छापेजिल्हा पोलिसांनी भंडारा व गोबरवाही परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर छापे घातले. यात पोलिसांनी पाच गुन्ह्यांची नोंद केली. कारवाईत ५९ लिटर हातभट्टी दारू व सडवा मोहफुल जप्त केले.
क्रीडा स्पर्धेत शिक्षकाचा मृत्यू
By admin | Updated: January 3, 2015 00:40 IST