शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

टी.सी.करिता विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:08 IST

सिहोरा येथील एका शाळेच्या दोन संस्थेचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांना दिला जात नाही. याप्रकरणी थेट विद्यार्थ्यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात धडक दिली. सोमवारी १७ जून रोजी शिक्षणाकाऱ्यांनी सिहोरा येथे येऊन विद्यार्थ्यांची समस्या दूर करण्याची ग्वाही दिली.

ठळक मुद्देप्रकरण सिहोरा येथील महाराष्ट्र शाळेचे : सोमवारी दाखला न मिळाल्यास विद्यार्थ्यांचा एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सिहोरा येथील एका शाळेच्या दोन संस्थेचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांना दिला जात नाही. याप्रकरणी थेट विद्यार्थ्यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात धडक दिली. सोमवारी १७ जून रोजी शिक्षणाकाऱ्यांनी सिहोरा येथे येऊन विद्यार्थ्यांची समस्या दूर करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलकर्ते विद्यार्थी माघारी परतले. सोमवारी सदर तिढा सुटतो की पुन्हा चिघळतो याकडे पालकासह विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.सिहोरा येथे महाराष्ट्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय असून येथे दोन संस्थेचा वाद मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. एका संस्थेच्या प्रस्तावावर शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी मुख्याध्यापक पदाला मान्यता दिली. तर दुसºया संस्थेने त्यावर आक्षेप घेतला. येथे मुख्याध्यापक पदावरुन दोन संस्थेत वाद सुरु आहे. संस्थेबाबत व मुख्याध्यापक पदासंदर्भात प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहे.इयत्ता दहावी व बारावी परिक्षेचा निकाल जाहिर झाला. बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला शाळेतून मिळणे क्रमप्राप्त आहे, परंतु संस्थेच्या वादामुळे शाळा सोडल्याचा दाखल्यावर स्वाक्षरी कोण करणार अशी मुख्य समस्या निर्माण झाली आहे. शाळेच्या रेकॉर्ड कुठे आहे, कुणाजवळ आहे. इत्यादी प्रश्न येथे उपस्थित झाले आहे. दररोज विद्यार्थी शाळेत दाखल्याकरिता जातात व रिकाम्या हाताने परत येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट सिहोरा पोलीस स्टेशनवरच धडक दिली.आम्हाला शाळा सोडल्याचा दाखला हवा, अन्यथा संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात लावून धरली. पोलीस ठाण्यात तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख, किसान संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर, सिंदपूरीचे मोरे, पं.स. सदस्य हिरालाल नागपूरेसह सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या भेटीला गेले. कालम शेख यांनी शिक्षणाधिकारी काटोलकर यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली. सोमवारी शिक्षणाधिकारी काटोलकर व त्यांचे प्रतिनिधी सिहोरा येथे महाराष्ट्र शाळेत दाखल होऊन विद्यार्थ्यांची समस्या दूर करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थी पोलीस ठाण्यातून माघारी परततले. सिहोऱ्याचे ठाणेदार गायकवाड यांनी प्रकरण योग्यरितीने हाताळले.सिहोरा येथील महाराष्ट्र शाळेत दोन संस्थेचे वाद सुरु आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. सोमवारी शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखल्याची समस्या दूर न केल्यास आंदोलन करण्यात येईल.- कलाम शेख, माजी सभापती पं.स. तुमसरसिहोरा परिसरातील शेतकऱ्यांची मुले महाराष्ट्र शाळेत शिक्षण घेत आहेत. शाहेच्या वादाशी विद्यार्थ्यांना काही देणे-घेणे नाही. विद्यार्थ्यांची समस्या सोमवारी न सुटल्यास अधिकाºयांना घेराव करण्यात येईल.- शुभम गभने, प्रदेश सचिव एनएसयुआय,तुमसर

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा