शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

दळणासाठी करदात्यांना आता मोजावे लागणार नाही पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST

महिलेच्या हस्ते लोकार्पण : हरदोली ग्रामपंचायतचा उपक्रम २७ लोक ०६ के मोहाडी : करमुक्त असणाऱ्या कुटुंबाला दळणासाठी वर्षभर एकही ...

महिलेच्या हस्ते लोकार्पण : हरदोली ग्रामपंचायतचा उपक्रम

२७ लोक ०६ के

मोहाडी : करमुक्त असणाऱ्या कुटुंबाला दळणासाठी वर्षभर एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, असा अभिनव प्रयोग ग्रामपंचायत हरदोली झंझाड येथील प्रशासनाने वास्तवात आणला. करदात्यांना मोफत दळण यंत्राचे लोकार्पण करण्यात आले. असा हा अभिनव उपक्रम राबविणारी कदाचित जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत असली पाहिजे.

वटसावित्रीच्या सणाचे औचित्य साधून ज्योती भोयर या महिलेच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मोहाडी तालुका अध्यक्ष राजेश हटवार, शिवसेना तालुका अध्यक्ष अनिल सार्वे, राष्ट्रवादी पक्ष तालुका महासचिव विजय पारधी, कांद्री वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, युवती कॉंग्रेस अध्यक्ष तारा हेडाऊ, राजेंद्र मेहर, माजी पं.स. सदस्य केशव बांते, प्रदीप बुराडे, पंढरीनाथ झंझाड, रवींद्र झंझाड, महादेव पाचघरे, डॉ. हिमांशु मते, मुरलीधर झंझाड, प्रदीप बुराडे, ग्रामसचिव गोपाल बुरडे आदी उपस्थित होते.

३१ मार्च २०२१ पूर्वी जे कुटुंब संपूर्ण करमुक्त होतील त्यांना वर्षभर ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोफत दळण करून मिळेल असा उपक्रम सरपंच सदाशिव ढेंगे यांनी हाती घेतला होता. यावर विश्वास ठेवून २५२ कुटुंबानी संपूर्ण कर भरला. करातून हरदोली /झंझाड ग्रामपंचायतच्या कोषात ६ लक्ष २७ हजार ६९२ रुपये ३१ मार्चपर्यंत जमा झाले. करमुक्त दात्यांना मोफत दळण लाभ देणाऱ्या योजनेचा करण्यात आला. दळण यंत्राद्वारे सर्वप्रथम दळण करून घेण्याचा व या योजनेत पहिला लाभार्थी होण्याचा सन्मान ज्योती भोयर या महिलेला मिळाला आहे. ग्रामीण जनता मात्र इमारत कर, पाणीपट्टी कर, दिवाबत्ती कर, स्वच्छता कर सामान्य आरोग्य आदी कर भरण्यास बेफिकिरी दाखवतात.

हरदोली ग्रामपंचायत अंतर्गत ६३२ करदाते आहेत. त्यापैकी ३१ मार्चपूर्वी २५२ करदात्यांनी कर भरला आहे. वर्षभर दळण मोफत ही योजना सुरू झाल्यानंतर कर भरण्यास वेग येणार आहे. असा प्रयोग करणारी हरदोली ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. डिसेंबरच्या ग्रामपंचायतीने मासिक सभेत एकमताने पारित केला आहे. मोफत दळण योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतीने शर्थी लागू केल्या आहेत. १४ लाख ३४ हजार ७६२ रुपयांची मागणी आहे. दहा लाख ७१ हजार ४२० रुपयांची थकबाकी आहे. ग्रामपंचायतने आतापर्यंत केवळ ६ लाख २७ हजार ६९२ रुपयांचा कर वसूल केला. कर भरा, दळण मोफत करा, ही योजना सुरू केली आहे. ३१ मार्चपर्यंत जे कुटुंब कर भरू शकले नाही, अशा कुटुंबांनी एक महिन्याच्या आत कर भरला तर त्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.

२०२१-२२ या वित्तीय वर्षात एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण कर भरतील, त्यांना वर्षभर गहू, तांदूळ, डाळीचे दळण सोमवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार या दिवशी मोफत करून मिळणार आहे. यासाठी २५२ करदात्यांना ओळखपत्र दिले गेले आहे. त्यात कुटुंबातील सदस्यांची नावे राहणार आहेत. करदात्यांना कर भरण्याची प्रेरणा मिळणार आहे. या गावाला अलीकडेच १० लक्ष रुपयाचा स्मार्ट गाव पुरस्कार प्राप्त झाला आहे. कार्यक्रमाला संगीता झंझाड, प्रेमलता झंझाड, भिवाजी गायधणे, विलास झंझाड, स्वप्निल माटे, पंढरीनाथ तांदुळकर, पेंदाम मॅडम, शीलाताई झंझाड, अंजना तांदुळकर, पंचफुला परसमोडे, दिगंबर झंझाड, यशवंत थोटे, प्रवीण तांडेकर, अभिजित पंकज झंझाड घोरमारे, आकाश बुरडे, विजय झंझाड, दिलदार गजभिये, प्रफुल धुमनखेडे, धार्मिक गुरुजी, विकास बुरडे,यांची उपस्थिती होती.

कोट

गावात थकीत करांचा आकडा वाढत आहे. त्याचा परिणाम गाव विकासावर होत आहे. कर बुडवेगिरीला लगाम लावला जावा. करदात्यांना करप्रणालीमध्ये नियमित करावे. ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी हा नवीन प्रयोग राबवला जात आहे.

- सदाशिव ढेंगे, सरपंच, ग्रामपंचायत हरदोली (झंझाड)

===Photopath===

270621\img-20210624-wa0054.jpg

===Caption===

मोफत दळण योजनेचा शुभारंभ