शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

उमेदवारीवरुन साकोलीत चर्चा अन् दिल्लीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 06:00 IST

विधानसभेसाठी नामांकन दाखल करण्याची ४ ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे. त्यात बुधवारी गांधी जयंतीनिमित्त सुटी आली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या हातात आता दोन दिवस उरले आहे. अशा स्थितीत अद्यापही कोणत्याच पक्षाने उमेदवारांची नावे घोषित केली नाही. दोन दिवसापूर्वी काँग्रेसने आपल्या ५१ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली होती. या यादीत काँग्रेसच्या मातब्बर उमेदवारांचा समावेश आहे.

ठळक मुद्देसंभ्रम कायमच : काँग्रेसच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच, भाजपच्या पहिल्या यादीने उत्सुकता शिगेला

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस उरले असतानाही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा सस्पेंस कायम आहे. तर उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण याची चर्चा रंगत आहे. साकोलीत चर्चा आणि दिल्लीत गोंधळ सुरु असून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विधानसभेसाठी नामांकन दाखल करण्याची ४ ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे. त्यात बुधवारी गांधी जयंतीनिमित्त सुटी आली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या हातात आता दोन दिवस उरले आहे. अशा स्थितीत अद्यापही कोणत्याच पक्षाने उमेदवारांची नावे घोषित केली नाही. दोन दिवसापूर्वी काँग्रेसने आपल्या ५१ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली होती. या यादीत काँग्रेसच्या मातब्बर उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या राज्यस्तरीय प्रचारसमितीचे प्रमुख नाना पटोले यांचे नाव या यादीत येईल अशी अपेक्षा मतदारसंघात होती. मात्र अपेक्षाभंग झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाना पटोले यांनी दिल्ली गाठली. या प्रकरणाची चर्चा मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरताच माजी आमदार सेवक वाघाये सोमवारी आपल्या समर्थक १२ जिल्हा परिषद सदस्यांसह तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्षांना घेऊन दिल्लीत दाखल झाले. गत दोन दिवसांपासून नाना पटोले आणि सेवक वाघाये दिल्लीत मुक्कामी आहेत.उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असून साकोलीत चर्चा आणि दिल्लीत गोंधळ अशी काहीही स्थिती झाली आहे. आता काँग्रेसची उमेदवारी कुणाच्या पारड्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे भाजपने घोषीत केलेल्या यादीतही साकोली विधानसभा मतदारसंघाचा समावेश नाही.साकोलीत अपक्ष आणणार रंगतविधानसभा निवडणुकीसाठी साकोलीत अद्याप उमेदवारीचे निश्चित नसले तरी पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली नाही तर काही जणांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी चालविली आहे. भाजप आणि काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली नाही. परंतु या दोन्ही पक्षांकडून इच्छुकांना उमदेवारी नाकारल्यास ते बंडखोरी करीत अपक्ष रिंगणात राहण्याच्या तयारीत आहेत. यामुळे साकोली विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. अपक्षांनी मैदानात उडी घेतल्यास त्यांची बंडखोरी थांबविण्यासाठी वरिष्ठांकडून मनधरणी होणार आहे. परंतु त्यानंतरही साकोलीत अपक्षच निवडणुकीत रंगत आणतील असे चित्र आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019