लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : लाखांदूर तालुक्यातील दिघोरी (मोठी) येथील आधारभूत धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांच्या धान मोजणीसाठी प्रशासनाकडून अनेक अडथळे निर्माण करण्यात आले होते. त्या विरोधात दिघोरीतील शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रासमोरच आमरण उपोषणाच्या आंदोलनाला सुरूवात केली. माजी आमदार बाळा काशिवार यांनी मध्यस्थी करून पणन अधिकारी व डेप्युटी सेक्रेटरी सुपे यांचेशी बोलणी करून उपोषणकर्त्यांच्या सर्वांच्या सर्व मागण्या मंजूर करवून घेतल्याने सर्व उपोषणकर्ते शेतकरी समाधानी झाले. अखेर माजी आमदार बाळा काशीवार यांनी लिंबूपाणी पाजून उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविले.जिल्हा पणन अधिकारी सी.डी. खाडे यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेवून समस्या जाणून घेतल्या.समस्यांचे निराकरण करण्यात पणन अधिकारी विफल ठरल्यानंतर बाळा काशिवार यांनी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आले. उपोषणाची सांगता झाल्यानंतर काही अवधीतच १२ हजार बारदाना खरेदी केंद्रासमोर येवून पडला व यापुढे खंड न पडता गोदाम चालू राहणार असल्याने सर्वस्तरातील शेतकऱ्यांनी उपोषणकर्ते अविनाश ब्राम्हणकर, अरुण गभने, गुलाब कापसे, मार्कंड हुकरे, मुखरू कापसे, पद्माकर चेटूले, खुशाल निनावे, सोपान भेंडारकर, रोषन नंदेश्वर, महादेव कांबळे, रवींद्र हटवार, डाकराम चेटूले यासह उपस्थिताचे अभिनंदन केले. यावेळी कोमल करंजेकार, कृष्णा देशमुख, जितेंद्र चेटूले आणि ठाणेदार निलेश गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST
माजी आमदार बाळा काशिवार यांनी मध्यस्थी करून पणन अधिकारी व डेप्युटी सेक्रेटरी सुपे यांचेशी बोलणी करून उपोषणकर्त्यांच्या सर्वांच्या सर्व मागण्या मंजूर करवून घेतल्याने सर्व उपोषणकर्ते शेतकरी समाधानी झाले. अखेर माजी आमदार बाळा काशीवार यांनी लिंबूपाणी पाजून उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविले.
शेतकऱ्यांच्या उपोषणाची सांगता
ठळक मुद्देदिघोरी येथील प्रकरण : उपोषणकर्त्यांच्या मागण्या मंजूर