शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महापुरातून धडा घेत प्रशासन होते 24 तास अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2022 05:00 IST

जिल्ह्यात वैनगंगा, चुलबंद, बावनथडी आणि कन्हान या नद्यांसह येणाऱ्या पुरामुळे हाहाकार उडतो. यावर्षी १२ जुलै रोजी जिल्ह्यात २५ मंडळात अतिवृष्टी झाली. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातही अतिवृष्टी होऊन नदीमार्गाने पाणी गोसे प्रकल्पात येत होते. धापेवाडा प्रकल्पातून ७ हजार क्युमेक्स विसर्ग सुरू झाल्याने पूरपरिस्थितीची शक्यता निर्माण झाली. नियोजनबद्ध उपाययोजना करून प्रशासनाने परिस्थितीवर मात केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन वर्षापूर्वी वैनगंगेला आलेल्या महापुराने सर्वत्र हाहाकार उडाला होता. कोट्यवधी रुपयांचे नुकसान या महापुराने झाले होते. या महापुरातून धडा घेत जिल्हा प्रशासन यावेळी २४ तास अलर्ट होते. अतिवृष्टी होऊनही जिल्ह्यात कुठेही मोठे नुकसान झाले नाही. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी यंत्रणेच्या सतत संपर्कात राहून सूचना दिल्याने पूरपरिस्थिती हाताळण्यात प्रशासनाला यश आले.जिल्ह्यात वैनगंगा, चुलबंद, बावनथडी आणि कन्हान या नद्यांसह येणाऱ्या पुरामुळे हाहाकार उडतो. यावर्षी १२ जुलै रोजी जिल्ह्यात २५ मंडळात अतिवृष्टी झाली. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातही अतिवृष्टी होऊन नदीमार्गाने पाणी गोसे प्रकल्पात येत होते. धापेवाडा प्रकल्पातून ७ हजार क्युमेक्स विसर्ग सुरू झाल्याने पूरपरिस्थितीची शक्यता निर्माण झाली. नियोजनबद्ध उपाययोजना करून प्रशासनाने परिस्थितीवर मात केली.

गावागावांत होमगार्ड तैनात- भंडारा जिल्ह्यात नदीतीरावर सुमारे १३० गावे आहेत. या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ उपाययोजना करता याव्या म्हणून गावागावांत होमगार्ड तैनात करण्यात आले. तसेच सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठीही अलर्ट मोडवर ठेवण्यात आले होते. 

शेवटच्या घटकापर्यंत प्रशासने होते संपर्कात- धापेवाडा प्रकल्पातून ७ हजार क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गोसेखुर्द धरणातून दोन हजार क्युमेक्स पाणी सोडण्यात येत होते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी एक झूम मिटिंग घेतली. त्यात जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्यासह गोसे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बीडीओ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सर्व ठाणेदार उपस्थित होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सूचना देण्यात आल्या. तसेच शेवटच्या घटकापर्यंत प्रशासन संपर्कात होते.३३ गेट उघडून १२ हजार क्युमेक्सपर्यंत विसर्ग- गोसेखुर्द प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केला की चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. परंतु तेथील जिल्हाधिकारी आणि संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधून प्रशासनाने ३३ गेट उघडण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पातून १२ हजार क्युमेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सतत १५ दिवसापासून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

तासातासाने मोजणी केली पाणीपातळीभंडारा शहरानजिक वैनगंगा नदीच्या लहान पुलाजवळ कारधा येथे पाणीपातळी मोजण्याची यंत्रणा आहे. अतिवृष्टीच्या काळात आपत्ती निवारण विभागाच्या वतीने दर तासाला येथील पाणीपातळी मोजण्यात आली. या पाणीपातळीची माहिती सोशल माध्यमातून नागरिकांपर्यंत           पोहचविण्यात आली. १३ जुलैपासून कारधा येथील वैनगंगेची पाणीपातळी वाढायला लागली. २४२.८ मीटरवरुन ती २४३ मीटरपर्यंत पोहचली. येथे इशारा पातळी २४५ मीटर तर धोकापातळी २४५.५० मीटर आहे. धोकापातळी ओलांडली की सर्व जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळेच येथील पाणीपातळीवर प्रशासन लक्ष ठेवून होते.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर