लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना आणली आहे. या योजनेत जुन्या व नवीन विहीरींसह अनेक प्रकारच्या सुविधांसाठी निधी दिला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया या योजनेसाठी लाभार्थी शेतकरी अनुसूचित जाती नवबौध्द व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. शेतकºयाच्या नावे जमीन धारणेचा सातबारा व आठ-अ असणे आवश्यक असून वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांच्या वर नसावे. संबंधित शेतकºयाला सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ५ आॅगस्टपासून आॅनलाईन अर्ज घेण्यास सुरूवात झाली आहे. ४ सप्टेंबरपर्यत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. अर्जाची प्रत कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडेही सादर करावयाची आहे. १०० टक्के अनुदानावर असलेल्या या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आहे.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गतही नवीन विहिरीच्या अनुदानासाठी आदिवासी शेतकºयांकडे ०.४० ते ६ हेक्टर शेतजमीन असावी. इतर बाबींच्या लाभासाठी ०.२० हेक्टरपर्यंत शेतजमीन असावी, अशी अट आहे.योजनेअंतर्गत, नवीन विहिरीकरिता शेतकऱ्यांना अडीच लाख रुपये, तर जुन्या विहीर दुरुस्तीकरीता ५० हजार रु पये, विद्युत जोडणीकरीता १० हजार रुपये, सौर कृषीपंप संचासाठी २० हजार रुपये, सुक्ष्म सिंचनास चालना देण्यासाठी ठिंबक सिंचन संचाकरिता ५० हजार रुपये, तुषार संचासाठी २५ हजार रुपये, तसेच शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे.
कृषी स्वावलंबन, क्रांती योजनेचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 01:04 IST