तेंदूचे पान-पान गोळा करुन ओढावा लागतो चरितार्थाचा गाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 09:57 PM2019-05-12T21:57:31+5:302019-05-12T21:57:50+5:30

भल्या पहाटे उठायचे. जंगलाचा रस्ता धरायचा. जंगलात दिसणारे हिरवेगार एक एक तेंदूपान तोडायचे. तोडलेली पाने घरी आणून पुडके बनवायचे आणि ती विकायची. अशी लगबग सध्या पवनी तालुक्याच्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. तेंदूचे एक एक पान गोळा करुन अनेक कुटुंब आपल्या चरितार्थाचा गाडा ओढत आहेत.

Tadu leaves and grows and grows | तेंदूचे पान-पान गोळा करुन ओढावा लागतो चरितार्थाचा गाडा

तेंदूचे पान-पान गोळा करुन ओढावा लागतो चरितार्थाचा गाडा

googlenewsNext
ठळक मुद्देरोजगार निर्मिती : ग्रामीण भागात कुटुंब गुंतले तेंदूपत्ता संकलनात

अशोक पारधी।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : भल्या पहाटे उठायचे. जंगलाचा रस्ता धरायचा. जंगलात दिसणारे हिरवेगार एक एक तेंदूपान तोडायचे. तोडलेली पाने घरी आणून पुडके बनवायचे आणि ती विकायची. अशी लगबग सध्या पवनी तालुक्याच्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. तेंदूचे एक एक पान गोळा करुन अनेक कुटुंब आपल्या चरितार्थाचा गाडा ओढत आहेत.
पवनी तालुक्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात तेंदूची झाडे आहेत. विडी व्यवसायासाठी तेंदूपान महत्त्वाचे आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात उन्हाळा लागला की, तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम सुरु होतो. घरातील आबालवृध्दासह सर्वजण या संकलनात सहभागी होतात. घरातील जेष्ठ मंडळी पहाटेच उठून जंगलाचा रस्ता धरतात. जंगलातील तेंदूची कोवळी पाने तोडून घरी आणतात. या पानाचे पुडके तयार केले जातात. एका पुडक्यात साधारणत: शंभर तेंदूपाने असतात. तयार केलेले पुडके गावातील संकलन केंद्रावर पोहोचविले जाते. मोजमाप करुन ती संबंधिताच्या हवाली केली जाते. यातून दिवसाकाठी एका कुटुंबाला २०० ते ३०० रुपये मिळतात. उन्हाळ्याच्या दिवसात तसेही शेतीची कामे नसल्याने अनेक कुटुंब तेंदूपता संकलनात गुंतले आहेत. दिवसभर राबल्यानंतर या कुटुंबाला समाधानाचे दोन घास मिळतात. सध्या पवनी तालुक्यात ठिकठिकाणी वाळू घातलेल्या तेंदूपत्ता पुडक्याचे फड दिसून येत आहेत.
पत्करावा लागतो धोका
पहाटेच्या अंधारात अनेक कुटुंब जंगलात संकलनासाठी जातात. यावेळी जंगलात वन्यप्राणी दिसतात. हिस्त्रप्राणी दिसला की पाचावर धारण बसते. मात्र पोटापुढे भीतीही गळून पडते. धोका पत्करत तेंदूचे पान-पान गोळा केले जाते.

Web Title: Tadu leaves and grows and grows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.