लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : दुचाकीने परत येत असताना सौंदड जवळील वळणावर झालेल्या अपघातात २४ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यु झाला. शिशुपाल हरीदास वरखडे रा. रावणवाडी असे मृताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारला सकाळी ६ वाजताच्या सुमारास अड्याळ-पवनी मार्गावरील सौंदड पुरर्वसन लगतच्या रस्त्यावर घडली. या घटनेने रावणवाडीत शोककळा पसरली आहे.प्राप्त माहितीनुसार शिशुपाल हा त्याच्या दुचाकी क्रमांक एमएच ३६ आर ९०६६ ने पवनीकडे गेला असावा. पवनीकडून परत येत असताना सौंदड पुनर्वसन गावाजवळील अपघात प्रवण स्थळावर गाडीवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे. पहाटेच्या सुमारास फिरायला गेलेल्या ग्रामस्थांना रस्त्याच्या जाबूवरील खोलगट भागात शिशुपाल हा मृतावस्थेत आढळला. त्याच्या बाजूला त्याची दुचाकीही पडली होती.शिशुपालच्या खिश्यातून ओळखपत्र मिळाल्याने त्याची ओळख पटली. वाहनाचे जास्त नुकसान झालेले नाही. त्याची दुचाकी झाडालाही आदळली नाही. एकंदरीत चर्चेनुसार हा अपघात नसून घातपात तर नसावा, अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.अड्याळ व परिसरात अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी पाहणाºयांची गर्दी उलटली. अड्याळ पोलीसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.शिशुपालचा मृत्यू अपघाताने झाला किंवा त्याचा घात करण्यात आला, अशी चर्चा सुरू असून उत्तरीय तपासणीच्या अहवालातूनच हे स्पष्ट होणार आहे.
अपघातात तरूणाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:17 IST
दुचाकीने परत येत असताना सौंदड जवळील वळणावर झालेल्या अपघातात २४ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यु झाला. शिशुपाल हरीदास वरखडे रा. रावणवाडी असे मृताचे नाव आहे.
अपघातात तरूणाचा संशयास्पद मृत्यू
ठळक मुद्देउत्तरीय तपासणी अहवाल महत्त्वाचा : अड्याळ-पवनी मार्गावरील घटना