शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या नावांचा ‘सस्पेंस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

भंडारा विधानसभेची कुणाला तिकीट मिळणार यावरून विविध चर्चा सुरु आहेत. भाजप-शिवसेना युतीतील आठवले गटाला ही जागा देणार असल्याची चर्चा बुधवारी रंगत होती. भाजपकडून निवडणुकीच्या तयारीत असलेल्यांच्या हृदयाचे ठोके वाढत गेले. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत मित्रपक्ष पीरिपाच्या कवाडे गटाला ही जागा जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देचर्चांना उधाण : भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या यादीकडे जिल्हावासीयांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याला अवघे दोन दिवस उरले असताना जिल्ह्यातील तीनही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांचा सस्पेंस कायम आहे. भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने बुधवारी रात्रीपर्यंत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नव्हती. त्यामुळे उमेदवारीवरून विविध चर्चांना उधाण आले होते. सोशल मीडियावर विविध नावांची चर्चा रंगत आहे. सर्वांच्या नजरा अधिकृत घोषणेकडे लागल्या आहेत.भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्या तीनही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. नामांकन दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असतानाही अद्यापर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवारी जाहीर केली नाही. मंगळवारी भाजप आणि काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. परंतु त्यात भंडारा जिल्ह्यातील एकाही मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यामुळे राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांची उत्सूकता वाढली आहे.भंडारा विधानसभेची कुणाला तिकीट मिळणार यावरून विविध चर्चा सुरु आहेत. भाजप-शिवसेना युतीतील आठवले गटाला ही जागा देणार असल्याची चर्चा बुधवारी रंगत होती. भाजपकडून निवडणुकीच्या तयारीत असलेल्यांच्या हृदयाचे ठोके वाढत गेले. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत मित्रपक्ष पीरिपाच्या कवाडे गटाला ही जागा जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काँग्रेस इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भंडारातून शिवसेनाही निवडणूक लढण्याच्या तयारीत होती. आता माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली आहे.तुमसर विधानसभा मतदारसंघातही अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली नाही. युती आणि आघाडी उमेदवारीसाठी घमासान दिसत आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आमदार चरण वाघमारे यांनी मंगळवारी अपक्ष आणि भाजपतर्फे नामांकन दाखल केले. परंतु पक्षाने अद्याप कुणाच्याही नावाची घोषणा केली नाही. त्यामुळे ऐनवेळेवर भाजप कुणाला तिकीट देणार याची उत्सूकता सर्वांना लागली आहे.जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ म्हणजे साकोली विधानसभा मतदार संघ होय. या मतदारसंघात काँग्रेसतर्फे नाना पटोले निवडणूक लढणार असे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपतर्फेही त्याच तोडीचा उमेदवार देण्याचा प्रयत्न चालू आहे. अद्यापपर्यंत कुणाच्या नावाची घोषणा झाली नसली तरी भाजप येथे तगडा उमेदवार देऊन निवडणुकीत रंगत आणणार आहे.एकंदरीत विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावाचा सस्पेंस अखेरच्या दिवसापर्यंत कायम राहणार अशी शक्यता दिसत आहे. दुसरीकडे बंडखोरी टाळण्यासाठी ऐन वेळेवर उमेदवारांची घोषणा केली जाणार असे सांगितले जात आहे.नामांकनासाठी आता दोन दिवसविधानसभेसाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख ४ आॅक्टोबर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत साकोली आणि तुमसर विधानसभा क्षेत्रातून प्रत्येकी दोन असे चार नामांकन दाखल झाले आहेत. शेवटच्या दोन दिवसात नामांकन दाखल करणाऱ्यांची सर्वाधिक संख्या राहणार आहे. उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षाचे अधिकृत उमेदवारही नामांकन दाखल करतील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019