शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

रेतीतस्करीला अधिकाऱ्यांचे पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात वैनगंगेसह विविध घाटांवर मोठ्या प्रमाणात उच्चदर्जाची रेती उपलब्ध आहे. या रेतीला विदर्भासह मध्यप्रदेशातही मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक व्यवसायीक यात उतरले आहेत. अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज घेऊन वाहने विकत घेऊन रेती वाहतुकीचा व्यवसाय सुरु केला आहे. परंतु आता या वाहतुकदारांनाच महसूल प्रशासन आणि पोलीस टार्गेट करीत आहेत.

ठळक मुद्देएल्गार : वैनगंगा वाळू वाहतूकदार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील रेती तस्करीला अधिकाºयांचेच पाठबळ असून त्यांच्या हप्तेखोरीसाठी आम्हाला टार्गेट केले जाते. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्याची वारंवार धमकी दिली जाते. जनमानसात आमची प्रतिमा मलीन होत असून संबंधित अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करा असे निवेदन वैनगंगा वाळू वाहतूकदार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील या वाहतूकदारांनी आता अधिकाऱ्यांविरुद्ध एल्गार पुकारला असून निवेदनात कुणाला किती हप्ते द्यावे लागते आणि शासनाचा कसा महसूल बुडतो याची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे महसूल आणि पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.भंडारा जिल्ह्यात वैनगंगेसह विविध घाटांवर मोठ्या प्रमाणात उच्चदर्जाची रेती उपलब्ध आहे. या रेतीला विदर्भासह मध्यप्रदेशातही मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक व्यवसायीक यात उतरले आहेत. अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज घेऊन वाहने विकत घेऊन रेती वाहतुकीचा व्यवसाय सुरु केला आहे. परंतु आता या वाहतुकदारांनाच महसूल प्रशासन आणि पोलीस टार्गेट करीत आहेत. घाटापासून संबंधित स्थळापर्यंत रेती वाहतूक करताना ठिकठिकाणी अडवणूक केली जाते. कधी महसूलचे पथक तर कधी पोलिसांचे पथक वसुली करीत असतात.या हप्तेखोरीमुळे अनेक वाहनचालकांना क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून न्यावी लागते. यामुळे शासनाचा महसूल तर बुडतोच सोबत रस्त्यांचेही मोठे नुकसान होते. रॉयल्टीची तीन ब्रास रेतीसाठी १२ हजार रुपये दर आहे. तेच विना रॉयल्टीने सात ते आठ हजार रुपयात मिळते. विशेष म्हणजे या वाहतूकदारांना घाटमालक कोणतेही बिल देत नाही. एका घाटावर साधारणत: पाच ते सहा लाख रुपयांचा व्यवसाय होते. परंतु केवळ ५० ते ६० हजार रुपयांचा व्यवसाय दाखवून जीएसटी बुडविली जाते. हा सर्व प्रकार खुलेआम चालत असताना केवळ उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करणाºया वाहनचालकांना टार्गेट टेले जाते, असे या निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर वैनगंगा वाळू वाहतुकदार संघटनेचे अध्यक्ष हरिष कोकासे, उपाध्यक्ष प्रकाश देशकर, शैलेश गजभिये, श्रीराम पोहरकर, भीम बारई यांच्यासह तब्बल ५० वाहतूकदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात ठोस कारवाई करावी अशी मागणी आहे. या निवेदनाने महसूल व पोलीस विभगात खळबळ उडाली आहे?जीपीएस अनब्लॉक का केले जाते ?रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस प्रणाली लावण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोठून व कोठे होते हे समजते. परंतु काही अधिकारी या वाहतुकीवर लक्ष ठेवून कारवाई करण्याऐवजी सरळ ट्रक मालकांशी संपर्क साधून बोलणी करतात, अन्यथा वाहनाचे जीपीएस बंद करण्यात येत आहे असे सांगतात. ठराविक रक्कम वसुल झाल्यानंतर जीपीएस सुरु होते. मोहाडी तहसीलदारांच्या आयडीवरून कितीवेळा लॉगींग केले आणि कितीवेळा ब्लॉक केले याची माहिती महामाईनिंगकडून मिळू शकते. जीपीएस अनब्लॉक का केले जातात याचे स्पष्टीकरण मोहाडी तहसीलदारांकडून घेण्याची माणगी या निवेदनात करण्यात आली आहे.ओव्हरलोड वाहतुकीकडे दुर्लक्षरेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जाते. त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी परिवहन विभागाची आहे. परंतु भंडारा येथील आरटीओ कार्यालयासमोरूनच रेतीचे ओव्हरलोड ट्रक धावतात. त्यावर कारवाई केली जात नाही. अवैध व ओव्हरलोड वाहतूक थांबविण्यासाठी जागोजागी पथक फिरविण्यापेक्षा एका ठिकाणी चौकी बसविली तर ही समस्या सुटू शकते. त्याठिकाणी २४ तास कॅमेरे लावण्याची आवश्यकता आहे. तसेच महसूल व पोलीस विभागासोबत परिवहन विभागाचे पथक गठीत करण्याची गरज असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :sandवाळू