शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. मध्ये आता सुपरफास्ट इंटरनेट; तुमच्या गावात आले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 14:21 IST

डिजिटलायझेशनवर भर : केंद्र सरकारच्या योजनेची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने गत चार-पाच वर्षांपासून डिजिटल धोरण अवलंबिले जात असून, बहुतांश कामे ऑनलाईन करण्यात आली आहेत. दरम्यान, गावपातळीवरही ऑनलाईन कामे पार पडावी, यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून ग्रामपंचायतींना सुपर फास्ट इंटरनेट देण्याची योजना अंमलात आणण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून प्रशासनाच्या पुढाकाराने बीएसएनएल व इतर कंत्राटदाराच्या सहाय्याने ग्रामपंचायतीमध्ये सुपर फास्ट इंटरनेट बसविण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील अनेक गावात सुपर फास्ट इंटरनेट सुविधा आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विकासकामांसोबतच आता नागरिकांचे कामे वेळेवर होणार आहेत. 

गावपातळीवर कार्यालयांना सुविधा

  • ग्रामपंचायत कार्यालयाचे ऑनलाईन कामकाज थांबू नये, कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ऑप्टीकल फायबरच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
  • ग्रामपंचायतींच्या गावात असणाऱ्या पाच कार्यालयांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा देण्याची गरज आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, पोलिस मदत केंद्र, तलाठी कार्यालय व वनपरिक्षेत्र कार्यालयांचा समावेश आहे

ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना इंटरनेट नाहीजिल्ह्यात ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यात आले आहे. मात्र, सातही तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील काही भागात आजही इंटरनेटची सुविधा अद्याप उपलब्ध झाली नाही. सध्या सुपर फास्ट इंटरनेट सुविधा देण्यासाठी काम सुरू केले आहे. 

स्पीडने इंटरनेट मिळत नाही ग्रामपंचायत कार्यालयात फायबर केबलच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा कार्यान्वित होत नसल्यामुळे येथे स्पीडने इंटरनेट मिळत नाही. पर्यायाने विविध दाखले तसेच दस्ताऐवज अपलोड करणे शक्य होत नाही. गतीमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतbhandara-acभंडारा