शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेवर अत्याचार करून आरोपीने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:31 IST

एका ६५ वर्षीय वृद्धेवर अत्याचार केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीने वैनगंगा नदीपात्रात आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारला दुपारी उघडकीस आली.

 भंडारा, दि. २७ -  एका ६५ वर्षीय वृद्धेवर अत्याचार केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीने वैनगंगा नदीपात्रात आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारला दुपारी उघडकीस आली. राहुल पुरूषोत्तम तलमले (२६) रा.भेंडारा असे मृत आरोपी तरूणाचे नाव आहे.  

पवनी तालुक्यातील भेंडारा येथील ही महिला घरी एकटी राहत होती. २५ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास आरोपी राहुल तलमले हा त्या महिलेच्या घरी गेला. तिच्या तोंडात कापड टाकून अत्याचार केला. त्यानंतर तिचे डोके भिंतीवर आपटून तिला मारहाण केली. यात ती गंभीररित्या जखमी झाली. दरम्यान घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून देऊन तो तिथून फरार झाला. रात्रभर ही महिला बेशुद्धावस्थेत राहिली. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी तिला शुद्ध आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर काल रात्री पवनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पवनी पोलिसांनी रात्रभर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी कुठेही सापडला नाही. दरम्यान, आज बुधवारला दुपारी एका तरूणाचा मृतदेह वैनगंगा नदीपात्रात तरंगताना आढळून आला. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असता तो बलात्कार करून फरार झालेला राहूल तलमले नामक आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पवनी मृत आरोपीविरूद्ध भादंवि ३७६, ३०७, ४५० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पवनीचे पोलीस निरीक्षक सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक चेतन बोरखडे हे करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याRapeबलात्कारCrimeगुन्हा