लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विद्यार्थ्यांनी टक्केवारीच्या नादात न जाता उच्चप्रतीचे शिक्षण घेऊन त्या शिक्षणाचा इतरांना व समाजाला लाभ करून द्यावा. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रमाणे शिक्षण घेतले व भारताचे संविधान लिहून सर्व लोकांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली, त्याचप्रमाणे आजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा उच्चप्रतीचे शिक्षण घेवून देशाला व समाजाला त्याचा लाभ मिळवून द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने जिल्ह्यातील दहावी, बारावी, युपीएससी, एमपीएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभाचा कार्यक्रम जिल्हा परिषद सभागृह, जि.प. भंडारा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण गाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, आमदार चरण वाघमारे, जात पडताळणी उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, तर प्रमुख उपस्थिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण मनिषा कुरसुंगे, विदर्भ अध्यक्ष प्रेम गजभिये, कोकण बँकेचे मॅनेजर सी.पी. रामटेके, अतिरिक्त जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. कसबेकर, संघटनेचे उपमहासचिव सुर्यकांत हुमणे, जिल्हा अध्यक्ष विनय सुदामे, युपीएससी परीक्षेत ८२८ क्रमांकाने उत्तीर्ण झालेले निखिल बोरकर आदी उपस्थित होते. संघटनेकडून पहिल्यांदाच आयोजित गुणवंतांचा कार्यक्रम घेण्यात आला. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या आठवणी सांगून उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. आमदार चरण वाघमारे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. संघटनेकडून घेण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत उत्सुकता जाहीर करत दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम संघटनेकडून घेण्यात यावा, संघटनेला काहीही मदत लागल्यास संघटनेसोबत असल्याचे प्रतिपादन आ. वाघमारे यांनी केले.अरुण गाडे यांनी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना मार्मीक असे शिक्षणाप्रती मार्गदर्शन केले. युपीएससीमध्ये उत्तीर्ण निखिल सुरेश बोरकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कुणालाही शिक्षणाकरिता मार्गदर्शन लागल्यास मी सदैव तत्पर असल्याचे सांगितले.संघटनेचे उपमहासचिव सुर्यकांत हुमणे यांनी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाºयांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळऊन देण्यासाठी नेहमी प्रयत्नरत राहील, अशी ग्वाही दिली. संचालन शिलवंतकुमार मडामे यांनी केले. त्यांनी प्रास्ताविक जिल्हा कोषाध्यक्ष हेमंत भांडारकर यांनी केले.हेमंत भांडारकर यांनी प्रास्ताविकात संघटनेनी केलेल्या कामाचे व संघटना फक्त कर्मचाºयांपुरतीच नसून सामाजिक कामातही अग्रेसर असल्याचे सांगितले. कार्यक्रमाकरिता संघटनेच्या राज्य महिला अध्यक्षा रजनी वैद्य, डॉ. महेंद्र गणवीर, कार्याध्यक्ष अशोक भोयर, उपाध्यक्ष मधुकर रूषेश्वरी, अनमोल देशपांडे, अजय रामटेके, विनोद मेश्राम, जिल्हा संघटक देवानंद नागदेवे, प्रभू ठवकर, विश्वानंद नागदेवे, यशवंत उईके, अनमोल शेंडे, अविनाश टांगले, नलिनी डोंगरे, छाया ढोरे, कुंदा गोडबोले, शिला कानेकर, वंदना भस्मे, माधुरी हटवार, एस. जनबंधू, अशोक डोंगरे, हंसराज बडोले, मुकेश फुलसुंगे, सरोज माटे व संघटनेच्या पदाधिकारी व सभासद, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन गोडबोले केले
विद्यार्थ्यांनी उच्च प्रतीचे शिक्षण घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:29 IST
विद्यार्थ्यांनी टक्केवारीच्या नादात न जाता उच्चप्रतीचे शिक्षण घेऊन त्या शिक्षणाचा इतरांना व समाजाला लाभ करून द्यावा.
विद्यार्थ्यांनी उच्च प्रतीचे शिक्षण घ्यावे
ठळक मुद्देसुहास दिवसे : कास्ट्राईबतर्फे गुणवंतांचा गौरव