विजय कापसे : वार्षिक स्रेहसंमेलन पालांदूर : विद्यार्थ्यांना शिक्षक मेहनत घेवून शिकवितात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनीसुद्धा परिश्रम करून शाळेचे व स्वत:चे नाव लौकिक करावे, असे प्रतिपादन लाखनी पंचायत समितीचे उपसभापती विजय कापसे यांनी केले. सरस्वती विद्यालय पालांदूरच्या वतीने आयोजित स्रेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संत कोलबास्वामी शिक्षण संस्थेचे संस्थापक कृष्णा धकाते हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य वर्षा रामटेके, सरपंच शुभांगी मदनकर होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथींचा परिचय मुख्याध्यापिका आरती धकाते यांनी केले. याप्रसंगी दहावी परीक्षेत प्रथम आलेली राजश्री बेंदवार, द्वितीय क्रमांकाने आलेला शोयात खान तसेच कलावंत विद्यार्थी गणेश बागडे या विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तद्वतच सेवानिवृत्त शिक्षक राघो फुल्लके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. स्रेहसंमेलनानिमित्ताने विविध शारीरिक प्रात्यक्षिके व वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सोहळ्याचे संचालन हरिश्चंद्र लाडे यांनी केले. तर आभार पुंडलिक खंडाईत यांनी मानले. कार्यक्रमासाठी नामदेव गिऱ्हेपुंजे, विमल गिऱ्हेपुंजे, ईश्वर हटवार, हिरामण माडखोलकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांनी परिश्रम करून शाळेचे नावलौकिक करावे
By admin | Updated: December 31, 2016 01:48 IST