शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची कुंडली डिजिटल लॉकरमध्ये, १२ अंकी अपार आयडी असणार नवीन ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 11:33 IST

शैक्षणिक कुंडली एका क्लिकवर : विद्यार्थ्यांसाठी 'अपार' आयडी

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आधार कार्डप्रमाणेच विद्यार्थ्यांची स्वतंत्र शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठविण्याच्या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रत्येक विद्यार्थ्यांचा 'अपार' (ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक रजिस्ट्री) नंबर तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. परिणामी जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हावी, तसेच पाहिजे तेव्हा ती ऑनलाइन स्वरूपात बघता यावी, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 'वन नेशन वन स्टुडंट' आयडीच्या धर्तीवर आता प्रत्येक विद्यार्थ्याचा इयत्ता नववीपासून अपार नंबर तयार करण्यात येणार आहे. यामुळे नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती उपलब्ध होणार आहे. हा नंबर डिजी लॉकरलाही जोडण्यात येणार आहे. पुढील एक महिन्यात यावर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना आहेत. यासंदर्भात २९ व ३० नोव्हेंबर रोजी अपार दिवस साजरा करण्याचे आदेशही सीईओंना दिले आहे.

भंडारा जिल्ह्यात अंमलबजावणी इयत्ता नववीपासून अपार आयडी तयार करण्याबाबतच्या सूचना शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार दिलेल्या निकषानुसार भंडारा जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. यू डायस प्लस प्रणालीच्या ज्या विद्यार्थ्यांचे आधार वैध असेल त्यांचेच अपार आयडी तयार होतील.

ग्राफिकल अॅनालिसिस होणार 'अपार मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत किंवा जिल्हा आणि राज्यामध्ये ऑनलाइन पाठविणे सुलभ होईल. विद्यार्थ्यांचे 'अपार' आयडी विद्या समीक्षा केंद्रांना जोडण्यात येऊन त्या माहितीचे ग्राफिकल अॅनालिसिस करण्यात येईल.

अपार आयडी म्हणजे काय? ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक रजिस्ट्री नंबर म्हणजेच अपार आयडी होय. यात विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती असेल.

अपारचा होणार हा फायदा यू डायस प्लस प्रणालीच्या ज्या विद्यार्थ्यांचे आधार वैध असेल, त्यांचेच अपार आयडी तयार होतील, अपारमुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा शोध, गळतीचे प्रमाण घटविण्यास मदत करणे आदी बाबी नियंत्रित करण्यात येणार आहेत.

एका क्लिकवर माहिती होणार उपलब्ध अपारमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे मॉनिटरिंग सोपे होणार आहे. 'अपार' आयडी तयार झाल्यानंतर तो डिजी लॉकरला जोडण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात साधलेले लक्ष्य, दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल, उपक्रम आणि स्पर्धा परीक्षांमधील यश आदी माहिती ऑनलाइन पाहता येणार आहे.

जिल्ह्यात विद्यार्थ्यांची तयार झाली अपार आयडी जिल्ह्यात एक हजार ३५७ शाळा असून या शाळांत दोन लाख ५६ हजारच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांची अपार आयडी तयार करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांचे अपार आयडी अपारमुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा शोध, गळतीचे प्रमाण घटविण्यास मदत करणे आदी बाबी डिजीलॉकरमध्ये नियंत्रित करण्यात येणार आहेत. यात सर्वच विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार केले जाणार आहेत. यातून विद्यार्थ्यांची विविध प्रकारची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. 

टॅग्स :bhandara-acभंडारा