शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
3
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
4
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
5
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
6
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
7
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
8
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
9
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
10
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
11
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
12
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
13
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
14
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
15
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
16
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
17
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
18
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
19
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
20
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...

प्रशासनाचा वज्र्राघात ; सुधारित आणेवारी ६२ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:55 IST

कर्जमाफीत शेतकºयांची प्रचंड बोळवण झाली असताना खरीप पिकाच्या सुधारित आणेवारीतून जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा बळीराजावर वज्राघात केला आहे.

ठळक मुद्देजावईशोध : शेतकºयांच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळण्याचा प्रयत्न

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवकभंडारा : कर्जमाफीत शेतकºयांची प्रचंड बोळवण झाली असताना खरीप पिकाच्या सुधारित आणेवारीतून जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा बळीराजावर वज्राघात केला आहे. जिल्ह्यातील खरीप पिकाची सुधारीत आणेवारी ^६२ पैसे घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळी नसल्याची बाब उघड झाली आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि कमी पर्जन्यमान असल्यावरही भंडारा जिल्हा प्रशासनाने एक महिन्यापूर्वी खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केलेली होती.खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून दृष्काळसदृश परिस्थिती असताना नजरअंदाज पैसेवारीच्या हंगामी आकडेवारीनंतर जिल्ह्यातील एकूण लागवड क्षेत्रापैकी असलेले पडीत क्षेत्र, कमी पर्जन्यमान, परतीच्या पावसात वादळी वाºयाने केलेले नुकसान याचा अंदाज घेवून सुधारीत आणेवारीत फायदा होईल, अशी शेतकºयांची आस होती. परंतू जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा जावईशोध लावीत शेतकºयांच्या वेदनेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या नजरअंदाज हंगामी पैसेवारीत पिक स्थिती उत्तम दाखविण्यात आली होती. दुसरीकडे दृष्काळसदृश्य परीस्थिती असताना आता पिक परीस्थिती उत्तम कशी झाली, असा सवाल शेतकरी विचारू लागला आहे. जिल्हा प्रशासनाने एकूण ८८४ गावांपैकी ८४३ गावांची सुधारीत पैसेवारी ६२ पैसे दर्शविली आहे. यात ५० पैसांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या एकही गावांचा समावेश नाही. शेतातील बांध्यांमध्ये पाणीच पडले नाही तर धान्य कसे उगवणार? क्षेत्राची आणेवारी जास्त कशी? असेही शेतकरी बोलून दाखवित आहेत.३३ टक्के पाऊस बरसला कमीमान्सून काळात जिल्ह्यात सरासरी १३३०.२ मि.मी इतका सरासरी पाऊस बसरतो. यावषी १ जून ते ३१ आॅक्टोबर ार्यंत सरासरी पावसापेक्षा ३३ टक्के पाऊस कमी बरसला. विशेष म्हणजे मागील वर्षी म्हणजेच सन २०१६-१७ या वर्षात पावसाची टक्केवारी ७६ इतकी होती. यावेळी मात्र मागील वर्षीच्या तुननेत ९ टक्के पाऊस कमी म्हणजे ६७ टक्केच बरसला. आधीच कमी पर्जन्यमान , धानावर रोगाचे आक्रमण, सिंचनाच्या अपुºया सुविधा यामुळे बळीराजा त्रस्त असताना सुधारीत आणेवारीतही प्रशासनाने ठेंगा दाखविला काय? असे म्हणने वावगे ठरणार नाही.अशी आहे तालुकानिहाय पैसेवारी५० पैसांपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४३ गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६१ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची सुधारीत पैसेवारी ५९ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ६३ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ६७ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ५७ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ६५ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ६० पैसे दाखविण्यात आली आहे. रब्बीच्या १४ गावांची पैसेवारी स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येणार आहे.