शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल व्हिडीओवरून उठलेले वादळ पुन्हा त्याच व्हिडीओकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:00 IST

३१ डिसेंबरच्या रात्री राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. अश्लील शिवीगाळ केली. त्याचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी आमदार राजू कारेमोरे यांना अटक केली. एक रात्र भंडारा कारागृहात काढावी लागली. व्यापाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणात व्यापाऱ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कोणतीच कारवाई झाली नाही. या एकतर्फी कारवाईने आता संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

तथागत मेश्रामलोकमत न्यूज नेटवर्कवरठी : आमदार राजू कारेमोरे यांनी वापरलेली भाषा समर्थनीय नाहीच. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईहीही झाली. मात्र पोलीस ठाण्यात गोंधळ घालतानाचा व्हिडीओ पुन्हा तपासून पाहण्याची वेळ आली आहे. जबाबदार अधिकारी ठाणेदाराचे अशोभनीय वर्तन या व्हिडीओत दिसत आहे. फिर्यादीला विचारपूस करण्याऐवजी त्यांच्या अंगावर ठाणेदार धावून जाताना दिसतात. मात्र कारवाई एकतर्फी करण्यात आली. त्यामुळे मोहाडी ठाण्यातील व्हायरल व्हिडीओवरून उठलेले वादळ पुन्हा त्याच व्हिडीओकडे वळत आहे.३१ डिसेंबरच्या रात्री राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. अश्लील शिवीगाळ केली. त्याचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी आमदार राजू कारेमोरे यांना अटक केली. एक रात्र भंडारा कारागृहात काढावी लागली. व्यापाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणात व्यापाऱ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कोणतीच कारवाई झाली नाही. या एकतर्फी कारवाईने आता संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. आमदारांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.आमदारांच्या शिवीगाळीचा व्हायरल व्हिडीओ पुन्हा एकदा तपासून पाहणे गरजेचे आहे. हा व्हिडीओ नेमका कुणी तयार केला याचाही शोध घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. या व्हिडीओत शिवीगाळ सुरू असताना ठाणेदारांची झालेली एन्ट्री आगीत तेल ओतण्यासारखी ठरली. जबाबदार अधिकाऱ्यांचे कृत्य अशोभनीय दिसते. शिव्यांची लाखोली सुरू असताना आमदारांना विचारपूस न करता फिर्यादीच्या अंगावर धावून जाताना ठाणेदार दिसतात. आमदारांच्या शिवीगाळीचे समर्थन नाही परंतु कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांचा हा बेजबाबदारपणाही तेवढाच महत्त्वाचा आहे. आता या व्हिडीओची तपासणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. त्यासाठी न्यायालयीन मार्ग शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

तक्रार दाखल करण्यास दिरंगाई- मारहाण झालेल्या दोन व्यापाऱ्यांची तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामुळे मित्रांसाठी आमदार कारेमोरे यांची ठाण्यात एन्ट्री झाली. आमदार ठाण्यात गेल्यावर त्यांची विचारपूस करण्याचे साधे सोपस्कारही अधिकाऱ्यांकडुन याठिकाणी झाले नाही.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेMLAआमदार