शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

स्टील, सिमेंटचे भाव उतरले; घरांच्या दराचे काय होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  भंडारा : स्वत:चे घर असावे, असे स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहत असतो; परंतु वाढत्या महागाईने घराचे स्वप्न ...

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : स्वत:चे घर असावे, असे स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहत असतो; परंतु वाढत्या महागाईने घराचे स्वप्न अपूर्ण राहते की काय, असे जाणवते. मात्र, बिल्डिंग मटेरियलच्या दरामध्ये घट झाल्याने बांधकाम क्षेत्रात वेग येईल, असे जाणवत आहे. मात्र, घरांच्या किमतीत घट होईल, याची शाश्वती नाही. परिणामी, स्टील, सिमेंट, विटा यांचे भाव थोडेफार उतरले तरी घरांच्या किमती जशाच्या तशा आहेत. त्यामुळे भंडारासारख्या शहरात तरी घरांच्या किमती कमी होतील, असे म्हणणे योग्य वाटणार नाही. नोटबंदी व जीएसटी नंतर जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठा परिणाम जाणवला होता. आता बांधकाम साहित्यांच्या दरातही थोडीफार घट झाल्याचे दिसून येत आहे.

व्यापारी म्हणतात...

- तीन महिन्यांच्या आकडेवारीवर नजर घातल्यास स्टील सिमेंटच्या भावात चांगलीच घसरण झाली आहे. ८५ ते ९० रुपये किलो दराने मिळणारे स्टील कमी झाले आहे. हा दर ६४ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. रेतीचे दर मात्र गगनाला भिडल्याने व घाटांचा लिलाव न झाल्याने समस्या वाढली आहे.

  आता घरांच्या किमती कमी व्हाव्यात  

सहा महिन्यांपूर्वी घर बांधकामाला सुरुवात केली होती; परंतु अजूनपर्यंत काम पूर्ण झाले नाही. मध्यंतरी स्टील व विटांचे भाव वाढले होते. खडीच्या भावातही वाढ झाल्याने काम थांबविले होते. मात्र, पुन्हा एकदा दर उतरले तरी घराच्या किमती कमी झाल्या नाहीत.     - मंगेश कोरे, भंडारा

बांधकाम साहित्याचे दर घसरले म्हणून जमिनीचेही भाव कमी होतील, असे काही ठरलेले नाही. आधीच प्राॅपर्टी डिलींच्या कामात मागील काही वर्षांपासून मंदी आली आहे. पुन्हा घरांच्या किमती कमी होतील, अशी आशा ठेवणे योग्य नाही, असे वाटते.     - विलास गोटेफोडे, लाखनी

प्रती चौरस फूट १८० रुपये दर भंडारासारख्या शहरात घर बांधायचे असेल तर कंत्राटदारांनी विविध दर ठरविले आहेत. सरासरी खालच्या म्हणजेच ग्राऊंड फ्लोअरचे बांधकाम करायचे असेल तर प्रती चौरस फूट १६० ते १८० व वरच्या माळ्याच्या बांधकामासाठी २०० रुपये प्रती फूट मोजावे लागतात.

 

टॅग्स :sandवाळू