तुमसर गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात दोन तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:48 AM2021-02-26T04:48:51+5:302021-02-26T04:48:51+5:30

तुमसर पंचायत समितीअंतर्गत ९७ ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र येत असून, या गावांतील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास घरकूल मंजूर झाली आहे. त्या लाभार्थ्यांच्या ...

Stay in the room of Tumsar Group Development Officer for two hours | तुमसर गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात दोन तास ठिय्या

तुमसर गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात दोन तास ठिय्या

Next

तुमसर पंचायत समितीअंतर्गत ९७ ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र येत असून, या गावांतील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास घरकूल मंजूर झाली आहे. त्या लाभार्थ्यांच्या खात्यात घरकूल योजनेची रक्कम तीन टप्प्यांत जमा केली जाते. परंतु प्रधानमंत्री आवास योजना विभागातील कंत्राटी अभियंता लाभार्थ्यांकडून खात्यात पैसे जमा करून देण्याच्या नावाखाली वसुली करीत असल्याचा आरोप आहे. याबाबतची तक्रार गटविकास अधिकारी धीरज पाटील यांना संबंधित लाभार्थ्यांनी केली, मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे तालुका काँग्रेस कमेटी व छावा संग्राम परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना कक्षाबाहेर जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत दोन तास ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणाची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी अभियंता बारस्कर यांना आपल्या कक्षात बोलावून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या वेळी तुमसर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर राऊत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश पारधी, पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख, हिरालाल नागपुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बालकदास ठवकर, सरपंच आनंद सिंगनजुळे, गळीराम बांडेबुचे, रामदास बडवाईक, देवा भगत, शुभम गभने, प्रफुल वराडे, भोला राखडे आदी उपस्थित होते.

.

Web Title: Stay in the room of Tumsar Group Development Officer for two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.