लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : कोरोना संकटामुळे अडचणीत आलेल्या मजुरांना काम मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने रोजगार हमी योजनेंतर्गत काम सुरु करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार लाखांदूर तालुक्यात रोहयोच्या कामांना प्रारंभ झाला.लाखांदूर तालुक्यातील चिचाळ, कोदामेंढी येथे शासन आदेशानुसार रोजगार हमी योजनेचे काम सुरु केल्याने ६०० मजुरांना काम उपलब्ध होणार आहे. महिन्याभरापूर्वी लॉकडाऊन झाल्याने अनेकाच्या हाताला काम मिळाले नव्हते. यासाठी शासनाने पुढाकार घेऊन ग्रामीण पातळीवर मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार हमी योजनेवर भर दिला आहे. तालुक्यातील चिचाळ, कोदामेंढी ग्रामपंचायती अंतर्गत चार आठवड्यापासून मातीकाम सुरु करण्यात आले आहे. भात खाचरे, बांध दुरुस्ती अशा कामांनी २३५ पुरुषांना तर ३३५ महिला मजुरांना काम मिळाले आहे. शासनाने काम उपलब्ध करुन दिले असले तरी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करने गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.ग्रामीण पातळीवर ग्रामसेवक भारती गेडाम, सरपंच लक्ष्मण जांगळे, रोजगार मीनाक्षी रंगारी यांनी काम सुरु असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत असल्याचे सांगितले.शासनाच्या निर्देशानुसार सर्व महिला-पुरुषांना मास्क, साबूचे वाटप करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन कामे केली जाणार आहेत.- भारती गेडाम, ग्रामसेविकामजुरांकडून शासन आदेशाचे कुठेही उल्लंघन होणार नाही यासाठी सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे.- लक्ष्मण जांगळे, सरपंच
लाखांदूरात रोहयो कामाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST
लाखांदूर तालुक्यातील चिचाळ, कोदामेंढी येथे शासन आदेशानुसार रोजगार हमी योजनेचे काम सुरु केल्याने ६०० मजुरांना काम उपलब्ध होणार आहे. महिन्याभरापूर्वी लॉकडाऊन झाल्याने अनेकाच्या हाताला काम मिळाले नव्हते. यासाठी शासनाने पुढाकार घेऊन ग्रामीण पातळीवर मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार हमी योजनेवर भर दिला आहे. तालुक्यातील चिचाळ, कोदामेंढी ग्रामपंचायती अंतर्गत चार आठवड्यापासून मातीकाम सुरु करण्यात आले आहे.
लाखांदूरात रोहयो कामाला प्रारंभ
ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचा वापर : लॉकडाऊनमध्ये मिळाला मजूरांना दिलासा