लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : स्वच्छता विषय हा आपल्या दैनंदिन व्यवहारातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग आहे. स्वच्छतेचा सरळ संपर्क आपल्या आरोग्याशी येतो. आपल्याला निरोगी राहायचे असेल तर घरातील कचरा शेजारी न टाकता योग्य ठिकाणी टाकला पाहिजे. आपल्या घरातील शेजारी टाकली म्हणजे आपले घर स्वच्छ होईल पण त्यापासून पसरणारी रोगराई यापासून आपण बचाव करू शकत नाही. विद्यार्थ्यांनी स्वच्छेतेसाठी जागृत असणे गरजेचे असून विध्याथ्यार्नी मनात आणले तर भारत अस्वच्छ राहूच शकत नाही. त्यामुळे विध्यार्थी व युवक-युवतींनी स्वच्छता मोहीम स्वत:पासून सुरु करा, असे आवाहन नागपूर विभागीय वरिष्ठ रेल्वे परिचालन प्रबंधक सचिन शर्मा यांनी केले.भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर आयोजित स्वच्छता जागरण अभीयनाच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात ते नवप्रभात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उद्देशून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे, दामोधर सारडा, विशू भुजाडे, विजय खंडेरा, स्टेशन मास्टर कल्याण रामटेके, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रावण मते, विष्णुपंत चोपकर, कविता वरठे, प्राध्यापक शशांक चोपकर, रविकांत डेकाटे, सहाय्यक स्टेशन मास्टर मुरमु , आर. जी. भोवते जेष्ठ नागरिक संगाच्या वतीने श्रवण मते, रवीकुमार डेकाटे, विष्णुपंत चोपकर, प्रा कविता वरठे , श्रीराम बोरकर, धार्मिक यांनी पुष्प देऊन नागपूर विभागीय वरिष्ठ रेल्वे परिचालन प्रबंधक सचिन शर्मा यांचे स्वागत केले.संचालन व आभार स्टेशन मास्टर कल्याण रामटेके यांनी मानले. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय भालेकर यांच्या सह रेल्वे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते
स्वच्छता अभियान स्वत:पासून सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 21:56 IST
स्वच्छता विषय हा आपल्या दैनंदिन व्यवहारातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग आहे. स्वच्छतेचा सरळ संपर्क आपल्या आरोग्याशी येतो.
स्वच्छता अभियान स्वत:पासून सुरु करा
ठळक मुद्देसचिन शर्मा यांचे प्रतिपादन : वरठी रेल्वेस्थानकावर स्वच्छता अभियान