शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरसाठी दर तासाला एसटी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

कोरोना संसर्गामुळे २२ मार्चपासून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान २२ मे पासून जिल्हांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली होती. पवनी, साकोली आणि तुमसरसाठी दर तासाने एक बस सोडण्यात येत होती. मात्र जिल्हाबाहेर जाण्यासाठी सर्वसामान्यांची मोठी अडचण होत होती. एसटीची चाके ठप्प असल्याने सर्वसामान्यांसमोर मोठा प्रश्न पडला होता. आता शासनाने आंतरजिल्हा वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देआजपासून आंतरजिल्हा वाहतूक सुरु : २२ प्रवाशांना प्रवासाची मुभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तब्बल पाच महिन्यांपासून बंद असलेली एसटीची आंतरजिल्हा वाहतूक गुरुवारपासून सुरु होत असून भंडारा येथून नागपूर जाण्यासाठी सकाळी ७ वाजतापासून दर तासाला बस उपलब्ध राहणार आहे. २२ प्रवाशांना प्रवासाची मुभा राहणार असून फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. आंतरजिल्हा बससेवा सुरु होत असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.कोरोना संसर्गामुळे २२ मार्चपासून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान २२ मे पासून जिल्हांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली होती. पवनी, साकोली आणि तुमसरसाठी दर तासाने एक बस सोडण्यात येत होती. मात्र जिल्हाबाहेर जाण्यासाठी सर्वसामान्यांची मोठी अडचण होत होती. एसटीची चाके ठप्प असल्याने सर्वसामान्यांसमोर मोठा प्रश्न पडला होता. आता शासनाने आंतरजिल्हा वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. त्याबाबतचे पत्र भंडारा राज्य परिवहन महामंडळाला प्राप्त झाले आहे.गुरुवार पासून भंडारा बसस्थानकावरून आंतरजिल्हा बससेवा सुरु केली जाणार आहे. भंडाराच्या बसस्थानकावरून नागपूरसाठी सकाळी ७ वाजतापासून दर तासाने एक बस सोडण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत बसफेरी सुरु राहील. या बसमध्ये केवळ २२ प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा राहणार आहे. फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून त्या प्रमाणात वाहतूक करण्यात येणार आहे. भंडारा शहरातून नागपूर येथे जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे. मात्र बससेवा बंद असल्याने त्यांना खासगी वाहनाने जावे लागत होते. त्यातही ई-पास काढावी लागत होती. या सर्वांना आता विराम मिळणार आहे.एसटी बसला ई-पासची गरज नाहीराज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यात येत आहे. एसटी महामंडळामार्फत चालविण्यात येणाºया बसेसला ई-पासची आवश्यकता राहणार नाही. प्रवासी प्रतिसाद पाहता त्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी भंडारा आगारप्रमुखांना दिले आहेत.महामंडळाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आंतरजिल्हा बसफेरी गुरुवारपासून सुरु करण्यात येणार आहे. पूर्वीप्रमाणेच नियमावली असून प्रवाशांचेही सहकार्य आवश्यक आहे.-सारिका लिमजे, सहाय्यक वाहतूक अधिकारी, भंडारा आगार.

टॅग्स :state transportएसटी