शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

जलस्तराचा वेग धिम्यागतीने

By admin | Updated: December 2, 2014 22:59 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याच्या कामाला एक महिन्यापर्यंत स्थगिती दिल्यानंतर दहा दिवसापासून जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले आहे.

गोसेबुज : विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याच्या कामाला एक महिन्यापर्यंत स्थगिती दिल्यानंतर दहा दिवसापासून जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले आहे. आज मंगळवारला जलस्तर २४०.६०० मीटरवर पोहचला आहे. परंतु या धरणामधील पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे संथगतीने जलस्तर वाढत आहे. दहा दिवसात केवळ दोन से.मी.ने जलस्तर वाढला आहे. त्यामुळे यावर्षी धरणाचा जलस्तर २४२ मीटरपर्यंत वाढविण्याची शक्यता कमी आहे. दिवाळीच्या पुर्वीपासून गोसीखुर्द धरणामध्ये जलस्तर वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले. परंतु, धरणाचा जलस्तर २४०.४०० मीटरवर पोहोचताच बुडीत क्षेत्रातील गावात पाणी शिरले होते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना घरातील साहीत्य काढण्याकरीता अडचणी आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या स्थानांतरणाची समस्या निर्माण झाली होती. अड्याळ जवळील धानाच्या शेतात धरणाचे पाणी शिरल्यामुळे धानपिक बुडू लागले होते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नवीन गावठानात जाण्याकरीता सुलभ होण्याच्या दृष्टीने व समोर दिवाळी असल्याने १९ आॅक्टोंबर पासून धरणाचा जलस्तर २४०.४०० मीटर वर स्थिर ठेवून जलस्तर वाढविण्याचे काम थांबविण्यात आले होते. २१ नोव्हेंबर पासून परत जलस्तर वाढवीणे सुरु झाले आहे. पण सध्या पाऊस नसल्यामुळे व वैनगंगा व तिच्या उपनद्यांकडून धरणामध्ये येणारा पाण्याचा प्रवाह फारच कमी आहे. त्यामुळे १० दिवसात केवळ २ से.मी.ने जलस्तर वाढत आहे. या वर्षी २४२ मीटरपर्यंत जलस्तर वाढवीण्याचे उद्दिष्ट आहे. पण हे काम फारच कठीण आहे. पाऊस वैगेरे आला तरच हे उद्दिष्ट पुर्ण होऊ शकेल. डिसेंबर अखेर पर्यंत वाढले तर वाढले पण त्यानंतर जलस्तर वाढण्याची अजीबात शक्यता नाही.पाथरी गावातील सर्व प्रकल्पग्रस्तांनी नवीन गाव ठानात स्थलांतर केल्यामुळे या गावाचा प्रश्न सुटला आहे. सावरगावच्या चारही बाजूने पाणी झाले आहे. पण या गावातील सर्व प्रकल्पग्रस्तांनी गाव रिकामे केले आहे.वडद मधील अनेक घरात पाणी शिरले आहे. २४१ मीटर पर्यंत तरी कोणत्याही गावाला धोका नाही. धोका असणारी गावे अगोदरच रिकामे झाले आहेत. (वार्ताहर)