शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पाण्याचा उपसा थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 05:00 IST

बावनथडी नदीच्या पात्रातून पाणी उपसा करणाऱ्या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात नवे संकट निर्माण झाले आहे. नऊ पंप असणाऱ्या या प्रकल्पात चार पंप नादुरुस्त आहेत. या नादुरुस्त पंपाचे साहित्य बेपत्ता झाले आहेत. तीन वर्षांपासून निविदा कंत्राटदाराने नादुरुस्त पंप प्रकल्प स्थळात आणले नाहीत. नागपुरात दुरुस्तीसाठी देण्यात आले असल्याची दिशाभूल माहिती सांगत आहेत. 

रंजित चिंचखेडेलोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा ) :  तुमसर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात चार पंप नादुरुस्त असल्याने पाण्याचा उपसा अडचणीत आला आहे. उर्वरित सुरू असणारे पाच पंप सलाईनवर असल्याने कोणत्याही क्षणी पाण्याचा उपसा थांबण्याची शक्यता आहे. निविदा कंत्राटदार प्रकाश मेश्राम यांनी पंपगृहाकडे दुर्लक्ष केल्याने संकट कोसळले आहे. पंपाच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा फटका ११० कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रकल्पाला बसला असून प्रकल्पच बंद होण्याच्या मार्गावर आला आहे.                   बावनथडी नदीच्या पात्रातून पाणी उपसा करणाऱ्या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात नवे संकट निर्माण झाले आहे. नऊ पंप असणाऱ्या या प्रकल्पात चार पंप नादुरुस्त आहेत. या नादुरुस्त पंपाचे साहित्य बेपत्ता झाले आहेत. तीन वर्षांपासून निविदा कंत्राटदाराने नादुरुस्त पंप प्रकल्प स्थळात आणले नाहीत. नागपुरात दुरुस्तीसाठी देण्यात आले असल्याची दिशाभूल माहिती सांगत आहेत. जे पंप दुरुस्तीकरिता जातात, ते पंप कधी परतले नाहीत. यामुळे प्रकल्पस्थळात सध्या स्थित पाच पंपांनी पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. पाणी उपसा करणारे पाच पंप सलाईनवर आहेत. पाणी उपसा करणारे पाचही पंप कोणत्याही क्षणात बंद करण्याची वेळ आली आहे. यामुळे नदीपात्रातून पाण्याचा उपसा थांबणार आहे. निविदा कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे प्रकल्प स्थळात संकट ओढवले आहे. या प्रकल्पात अनेक वर्षांपासून निविदा कंत्राटदाराने भेट दिली नाही. यंत्रणेतील अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन नागपूर, भंडाऱ्यातून प्रकल्पाचा डोलारा सुरू ठेवण्यात आलेला आहे. नादुरुस्त पंपाचा थांगपत्ता नाही. 

एकाच परिचालकाच्या खांद्यावर ओझे- पंपगृह संचालनासाठी तीन परिचालकांची नियुक्ती करण्याचे नियोजित आहे. परंतु या प्रकल्पात एकाच परिचालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. रात्र आणि दिवस या एकाच परिचालकाला अल्प मानधनावर  कामे करावी लागत आहेत. पंपगृह संचालनासाठी परिचालकांची नियुक्ती करण्याची जबाबदारी निविदा कंत्राटदार प्रकाश मेश्राम यांची आहे. परंतु पैशांची बचत करण्यासाठी उर्वरित पदे भरण्यात आले नाहीत. अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत प्रकल्पस्थळात अनागोंदी कारभार सुरू असताना सारेच गहिवरल्यासारखे वागत आहेत. प्रकल्प स्थळातील पंपगृहाचे वाटोळे करणाऱ्या निविदा कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याची मागणी होत आहे.

चांदपूर जलाशयाचे पाणी सोडा- पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली असल्याने शेत शिवारात पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. धान पिकांना पाण्याची गरज आहे. टेलवरील शेत शिवारात पाणीच नसल्याने खत व फवारणीची कामे अडली आहेत. चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यासाठी जलद गतीने निर्णय घेतले पाहिजेत. तत्पूर्वी पाणी सोडताना पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतशिवाराचे निरीक्षण केले पाहिजे. यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही, अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांनी केली आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण