महावितरणचा अल्टीमेटम : पाटबंधारे विभागाची यंत्रणा गावात, ३८.१८ लाखांची थकबाकीरंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)पाणीपट्टी कराची वसुली प्रभावित झाली असल्याने महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे विजेचे देयक भरण्यात आले नाही. यातच महावितरणने कायम स्वरुप वीज पुरवठा खंडीत करण्याचे पत्र दिल्याने यंदा प्रकल्प पाण्याचा उपसा करणार किंवा नाही, अशी साशंकता निर्माण झाली आहे.सिहोरा परिसरात बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाकडे वीज देयकाची वाढती थकबाकी आहे. ही विजेची थकबाकी पाणीपट्टी करांच्या वसुलीतून देण्याचे निर्देश राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने दिले आहे. पाणीपट्टी वसुली करणारी यंत्रणा पाटबंधारे विभागाची आहे. या विभागाने पाणीपट्टी कराची वसुली करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. गावात शेतकऱ्यात जागृकता व प्रकल्पस्थळाची कैफियत सांगण्यात येत आहे. परंतु खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी शेतीच्या हंगामात गुंतला आहे. यामुळे या जागृती अभियानाला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद प्राप्त होत आहे. असे करीत असताना सुद्धा पाणीपट्टी करांची वसुली प्रभावित झाली आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाचे वसुलीचे सत्र सुरु असताना नवीन दराची आकारणी करण्यात आली नाही. शासनाचे उशिरा दर आकारणीचे पत्र प्राप्त झाल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहे. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर पाणीपट्टी करांची वसुली देण्याची मानसिकता शेतकऱ्यांची नाही. सलग दोन वर्षापासून दुष्काळसदृष्य परिस्थितीचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांनी पाणीपट्टी करांच्या देयकाकडे पाठ फिरविली आहे. पाणी पट्टीकरांची वसुली थंडबस्त्यात जात असल्याने प्रकल्पस्थळात असणाऱ्या खंडीत वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यास अडचणीत वाढ झाली आहे.दरम्यान या प्रकल्पस्थळात असणाऱ्या समस्या निकाली काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. पंपगृहात असणारी गाळ काढण्यात येत आहे. पाण्याचा उपसा करण्यासाठी ९ पंपगृह तयार अहेत. नादुरुस्त यंत्राची दुरुस्ती करण्यात येत आहे. मात्र प्रकल्पस्थळात अंधार आहे. पाणीपट्टी करांची वसुली प्रभावित झाली असताना थकीत विजेचे देयक भरण्यासाठी उपाययोजना संदर्भात कुणी बोलत नाही. निधी कुठून आणणार असे कुणी सांगत नाही. पाणीपट्टी करांची वसुली करण्याची आता वेळ नाही. जुलै महिन्यात पाण्याचा जलाशयात उपसा करण्याची परंपरा आहे. त्या दिशेने प्रकल्पस्थळात समस्या निकाली काढताना लगबग सुरु झाली आहे. ३८ लाख १७ हजार ७८० रुपयांची अद्याप विजेची थकबाकी आहे. तत्पूर्वी वाढती थकबाकी असल्याने महावितरणने वीज पुरवठा खंडीत केला आहे. आता कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्याचा अल्टीमेटम पत्रातून दिला आहे. असे पत्र पाटबंधारे विभागात धडकले आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर महावितरण थकबाकी वसुली करीता आक्रमक झाली आहे. प्रभारी शाखा अभियंता व चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी शेतकऱ्यांचे दार व घरे पिंजून काढत आहेत.प्रकल्पस्थळात असणाऱ्या समस्या निकाली काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. टाकीतील गाळ उपसा करण्यात येत आहे. पाणीपट्टी करांच्या वसुलीतून विजेचे देयक भरण्याचे शासन निर्देशीत असल्याने लघु पाटबंधारे विभागाकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.- पी.एन. लांजेवारउपविभागीय अभियंता, उपसा सिंचन योजना, तिरोडापाणीपट्टी करांची वसुली देयकांसाठी ग्रामपंचायत व गावातील शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात आहे. महत्वाकांक्षी प्रकल्पाविषयी जागृकता आणली जात आहे .गावात तातडीने बैठका घेण्याचे तंत्र सुरु झाले आहे. नागरीकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.- एस.एन. वाईनदेशकरशाखा अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सिहोरायंदा शासनानी पाणीपट्टी करांची दर आकारणी उशिरा प्राप्त झाल्याने वसुली प्रभावित झाली आहे. राज्य शासनाने थकीत विजेचे देयकांचा भार उचलायला पाहिजे. नदीपात्रातून पाण्याचा उपसा अडचणीत आल्यास रास्ता रोको आंदोलन करणार आहे.- धनेंद्र तुरकरसदस्य, जिल्हा परीषद सिहोराशेतकऱ्यांची पाणीपट्टी करांची वसुली प्रभावित झाली असली तरी प्रकल्पस्थळाचा वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्याची आमदार चरण वाघमारे यांनी प्रयत्न सुरु केले आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे. सर्वांच्याच प्रयत्नानंतर वीज पुरवठा पूर्ववत सुरु होऊ शकतो.- लक्ष्मीकांत बानेवारमहामंत्री भाजप तुमसर तालुका
सोंड्याटोलाचा वीज पुरवठा खंडित होणार
By admin | Updated: June 12, 2016 00:18 IST