शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

..अन् झोपेत असलेल्या वडिलांना क्रूरकर्म्याने खाटेवरच संपविले; भंडाऱ्यातील थरारक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 10:52 IST

वडिलांचा खून करुन पसार झालेल्या मुलाला अवघ्या पाच तासात अड्याळ पोलिसांनी जेरबंद केले.

ठळक मुद्देआराेपी मुलाला अटक

अड्याळ (भंडारा) : शेती व जागेच्या हिस्से वाटणीवरून घरातील खाटेवर झोपून असलेल्या वृद्ध वडिलांच्या मानेवर मुलाने कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. ही घटना पवनी तालुक्यातील फणाेली येथे शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता उघडकीस आली. पसार झालेल्या मुलाला अवघ्या पाच तासात अड्याळ पोलिसांनी जेरबंद केले.

शंकर महादेव कावळे (६०, रा. फणोली, ता. पवनी) असे मृत वडिलांचे नाव आहे, तर दुर्योधन शंकर कावळे (३५) असे आरोपी मुलाचे नाव आहे. वडील आणि मुलात गत काही दिवसांपासून शेती व जागेच्या हिस्से वाटणीचा वाद सुरु होता. गुरुवारी रात्रीही याच कारणावरून वाद झाला. त्यानंतर शंकर आपल्या खोलीत झोपायला गेले. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास मुलगा दुर्योधनने झोपेत असलेल्या वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातले. त्यात ते जागीच ठार झाले. यानंतर मुलगा दुर्योधन तेथून पसार झाला. पहाटे ५.३० वाजता हा प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच अड्याळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे घटनास्थळी पथकासह दाखल झाले. आरोपीची शोधमोहीम सुरू केली. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांनी भेट दिली.

अवघ्या पाच तासात आरोपी जेरबंद

वडिलांचा खून करुन पसार झालेल्या मुलाचा पोलिसांनी शोध सुरु केला. त्यावेळी भंडारा - नागपूर मार्गावरून तो सायकलने जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन अड्याळ पोलिसांनी जवाहरनगर ते मुजबी दरम्यान त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस कर्मचारी हेमराज सोरते, सुभाष रहांगडाले, प्रमोद कमाने, संदीप नवखरे, जितेंद्र वैद्य, मनोज राने, हितेश हलमारे, भूषण मेश्राम यांनी केली. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गोदमले, पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र इंगोले अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडाराPoliceपोलिस