शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

साकोली पोलिसांनी राबविला नशामुक्तीचा अभिनव उपक्रम

By admin | Updated: January 14, 2016 00:49 IST

पोलीस ठाणे साकोली मार्फत मौजा पळसगाव येथील जि.प. शाळेत नशा व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

साकोली : पोलीस ठाणे साकोली मार्फत मौजा पळसगाव येथील जि.प. शाळेत नशा व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात लोकांनी नशामुक्त व्हावे व स्वत:चे भविष्य सुधारावे करिता मनोज कोटांगले रा. एकोडी यांनी कलापथकाचे माध्यमातून नशा केल्याने मानवी शरीरावर होणाऱ्या दृष्परिणामाबाबत व समाजाचा व्यसनाधीन व्यक्तीकडे पाहण्याच्या दृष्टीकोन याबाबत महत्व पटवून दिले. तसेच बाबुराव भाजीपाले रा. परसोडी यांनी व्यसनमुक्त राहण्याकरिता उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच तिरतराम शहारे रा. पिंडकेपार यांनी जे इसम दारू पिण्याच्या आहारी गेल्याने त्यांचे संसार उध्वस्त होतात अशा इसमांना दारू पिण्यापासून प्रवृत्त होणेसाठी समाजप्रबोधनपर प्रवचन केले. या प्रवचनातून उपस्थितांपैकी जवळपास ३५ ते ४० लोकांनी दारू सोडल्याबाबत शपथ घेवून भविष्यात दारू अथवा कोणतेही व्यसन करणार नाही याबाबत स्वईच्छा दर्शवली. तिरतराम शहारे रा. पिंडकेपार यांनी लोकांनी दारूचे व्यसन सोडावे म्हणून मोफत औषध वाटप केली. ठाणेदार सुरेशकुमार घुसर यांनी उपस्थित गावकरी लोकांना नशामुक्त व व्यसनमुक्त होण्यासाठी प्रोत्साहीत करून जोपर्यंत स्वत:चे दृढ निश्चय राहणार नाही तोपर्यंत लोक नशामुक्त होणार नाही व कुटूंबातील स्त्री शिक्षित असल्यास घरचा सदस्य नशामुक्त होण्याचे फायदे पटवून दिले पोलीस स्टेशनमार्फत होणाऱ्या अशा व्यसनाधीनतेचे कार्यक्रमाला सर्वबाजुंनी स्वागत व कौतुक होत आहे कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, सहायक फौजदार गोंडगे, पोलीस हवालदार गोबाडे, भुतांगे, पोलीस नायक भजनकर, गायकवाड, पोलीस शिपाई पाठक्, पळसगाव येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच कामिनीबाई भेंडारकर, तंटामुक्ती अध्यक्ष पुरूषोत्तम वाढई, पोलीस पाटील पे्रमलाल कोरे यांनी अथक परिश्रम घेवून कार्यक्रम यशस्व केला. जवळपासचे गावातील व परिसरातील लोकांनी सहभाग दर्शविला. सदर कार्यक्रमात ८०० ते १००० नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)