शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत पोलिसांची जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:14 IST

साकोली तालुक्यात चोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. सध्या लग्नसराईचा मुहूर्त असल्याने साकोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत बन्सोडे यांनी साकोली येथील चौका-चौकात गर्दीच्या ठिकाणी व साकोली परिसरातील ५० गावामध्ये सूचना पत्रकाचे वाटप करून जनजागृती व प्रबोधन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : साकोली तालुक्यात चोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. सध्या लग्नसराईचा मुहूर्त असल्याने साकोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत बन्सोडे यांनी साकोली येथील चौका-चौकात गर्दीच्या ठिकाणी व साकोली परिसरातील ५० गावामध्ये सूचना पत्रकाचे वाटप करून जनजागृती व प्रबोधन केले.चोरी होऊ नये याकरिता ठाणेदार बंडोपंत बन्सोडे यांनी प्रबोधन करताना सांगितले की आपण परिवारासह जात असल्यास आपल्या जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी तसेच दागिने व रोख रक्कम बँक लॉकरमध्ये ठेवावी. गर्दीच्या ठिकाणी सोन्याच दागिने पर्स मोबाईल वापरताना खबरदारी घ्यावी.आजुबाजूच्या परिसरात संशयित व्यक्ती आढळून आल्यास पोलीस ठाण्याला त्वरित माहिती द्यावी. बँकेतून पैसे काढल्यानंतर कोणी अनोळखी संशयीत व्यक्ती तुमच्यावर पाळत ठेवत असल्यास तत्काळ बँक मॅनेजर सोबत संपर्क करून पोलीस ठाण्याला माहिती द्यावी. फेसबुक, व्हॉटअप, कुटुंबांचे फोटो अपलोड करताना त्याचा कोणी गैरवापर नाही याची खबरदारी घ्यावी. सर्व नागरिकांनी प्रत्येक धर्माचा आदर करावा, अफवावर विश्वास न ठेवता कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलिसांना सहकार्य करावे.अनोळखी व्यक्तीस घरात येवू नये, आपल्या सबंधी त्यास कोणतीही माहिती देवू नये, बस किंवा रेल्वेने प्रवास करताना अनोळखी व्यक्तीकडून खाद्य पदार्थ दिल्यास त्याचे सेवन करू नये, त्यामध्ये गुंगीकारक पदार्थाचा वापर करून चोरी केली जावू शकते, महिलांनी घरी हजर असताना किंवा बाजारात खरेदी करताना किंवा प्रवासात कोणत्याही खोट्या आमिषाला अगर अफवांना बळी पडू नये, बँकेतून पैसे काढल्यास अनोळखी व्यक्तीस मोजण्याकरिता देवू नये किंवा दुचाकी वाहनाच्या डिक्कीमध्ये ठेवू नये, कोणतीही शासकीय नोकरी गुणवत्तेशिवाय मिळत नाही त्यामुळे शासकीय नोकरी मिळवून देण्याकरिता कोणालाही पैसे देवू नये.साकोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत बन्सोडे यांनी ५० गावात पत्रके वाटून प्रबोधन केले. साकोलीमध्ये प्रत्येक दुकानदाराला पत्रक वाटण्यात आले. साकोली परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Policeपोलिस