शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

विद्रुप चौकांना हवा ‘स्मार्ट लूक’

By admin | Updated: October 25, 2015 00:33 IST

शहरातील चौक हे त्या शहराची ओळख निर्माण करणारे असतात. मुख्य चौकांमुळे शहराचा रुबाब लक्षात येतो.

चौकांना अतिक्रमणाचा विळखा : बॅनर, पोस्टर्सही हटविणे आवश्यकभंडारा : शहरातील चौक हे त्या शहराची ओळख निर्माण करणारे असतात. मुख्य चौकांमुळे शहराचा रुबाब लक्षात येतो. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीसाठी चौक हेच मार्गदर्शक असतात. म्हणूनच की काय चौकातील वाहतूक व्यवस्था, सौंदर्यीकरण, मार्गांची माहिती दर्शनीय भागात दिसेल असे फलक, पुतळ्यांची स्थिती आणि तेथील दृष्यबाबी त्यावर प्रभाव पाडत असतात. मात्र भंडारा शहरातील चौक यातील कोणतेही निकष पूर्ण करताना दिसत नाही. चौकात ट्रॅफिक सिग्नलचा बोजवारा आहे. एकाही चौकात हिरवळीचा लवलेश नाही. वाहतूक नियमावली दर्शविणारे चिन्ह चौकातून गायब आहेत, चौकात रस्त्यांची माहिती दर्शविणारे फलक आढळत नाही. मात्र जाहिरातींच्या फलकांनी चौकांचे विद्रुपीकरण झालेले दिसते. चौकांचे असेच विद्रुपीकरण सुरू राहिले तर या शहराला ‘स्मार्ट लूक’ कसा येणार, यावर विचार करण्याची गरज आहे. जाहिरातींचा ओंगळवाणा बाजारशहरातील चौकांमध्ये जाहिरात फलकांचा बाजार किळसवाणा होत चालला आहे. राजकीय पदाधिकारी, कंपन्या, दुकानांच्या जाहिरात फलकांनी चौक भरून आहेत. यामुळेच नियम फलक व रस्त्यांची माहिती देणारे आवश्यक फलक लावायला जागा उरली नाही. या जाहिरातबाजीवर प्रशासनाचेही नियंत्रण राहिले नसल्याने हा ओंगळवाणा प्रकार फोफावला आहे. यामुळे चौकांचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येते. चौकांना स्मार्ट स्वरूप द्यायचे असेल तर या विद्रुपीकरणाला आळा घालणे आवश्यक झाले आहे.वाहतुकीचा गोंधळचौकात शिस्तीचा अभाव असल्याने शहरातील जवळपास सर्वच चौकात वाहतुकीचा गोंधळ उडाल्याचे चित्र पहायला मिळते. मुख्य चौकातील महत्त्वाची समस्या म्हणजे वाहतुकीची आहे. आॅटोचालक प्रवासी मिळविण्यासाठी सैरभैर फिरत असतात. यामुळे इतर वाहनचालकांचे लक्ष राहिले नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे पादचाऱ्यांनाही त्रासाला सामोर जावे लागते. चौकात जड वाहने, कार आणि दुचाकी कशाही पद्धतीने उभ्या राहतात. वाहतुकीचा हा गोंधळ सोडविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)