शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
4
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
6
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
7
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
8
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
9
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
10
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
11
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
12
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
13
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
14
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
15
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
16
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
17
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
18
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
19
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
20
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न १३११ कोटींचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:03 IST

केंद्र शासनाच्या ‘स्मार्टर् सिटी’ अभियानाच्या अंतिम फेरीसाठी अमरावती महापालिकेने १३११ कोटी रुपयांचा आराखडा बनविला आहे.

ठळक मुद्देअखेरची संधी : राज्यातून एकमेव शहर स्पर्धेत, ३० नोव्हेंबरपर्यंत केंद्राकडे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाच्या ‘स्मार्टर् सिटी’ अभियानाच्या अंतिम फेरीसाठी अमरावती महापालिकेने १३११ कोटी रुपयांचा आराखडा बनविला आहे. हा आराखडा शुक्रवारी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला. ३० नोव्हेंबरपूर्वी तो केंद्र शासनाच्या शहर विकास मंत्रालयाकडे पाठविला जाईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्पनेतून आकारास आलेल्या ‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेत महापालिकेने यापूर्वी तीनदा सहभाग घेतला. मात्र, प्रस्ताव स्पर्धेत तग धरू शकला नाही. त्या पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एक सर्वंकष प्रस्ताव अंतिम फेरीसाठी पाठविण्याचे निर्देश पालिकेला प्राप्त झाले. त्याअनुषंगाने पीडब्ल्यूसी कंपनीने पॅनसिटी व रेट्रोफिरिंग या दोन मुख्य घटकांचा समावेश करून ‘स्मार्ट अमरावती’चा प्रस्ताव बनविला. पहिले तिन्ही प्रस्ताव सदोष असल्याने आलिया कन्सल्टंसीऐवजी डीपीआर बनविण्यासाठी पीडब्ल्यूसी या नव्या कन्सल्टंसीला पाचारण करण्यात आले. महापालिका आयुक्त हेमंत पवार व महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेत गुरुवारी या एजन्सीने सादरीकरण केले. कंपनीने तयार केलेला विस्तृत प्रकल्प आराखडा शुक्रवारी राज्य शासनास पाठविण्यात आला. यात घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक सुरक्षा, रोजगार निर्मिती, पार्किंग, कनेक्टव्हिटी, हेरिटेज संवर्धन, सौंदर्यीकरण, तर पॅनसिटी व रेट्रोफिटिंगमध्ये झोपडपट्टी व जुन्या शहरांचा विकास या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.चौथा प्रस्तावयाआधी महापालिकेने ‘स्मार्ट सिटी’साठी तीनदा प्रस्ताव पाठविले; मात्र ते स्पर्धेत टिकू शकले नाहीत. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या काळात ५५०० कोटी, त्यानंतर हेमंत पवार यांच्या कार्यकाळात अनुक्रमे २२६८ कोटी व १८०५ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला.जानेवारी २०१६ पासून केंद्र सरकारने ९० स्मार्ट सिटी घोषित केल्या. पहिल्या यादीत २०, दुसºया यादीत १३, तिसºया यादीत २७ व चौथ्या यादीत ३० शहरांचा समावेश होता. यंदाची स्पर्धा ११ शहरांसाठी आहे.