शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

तीन पदांसाठी सहा नामांकन

By admin | Updated: November 27, 2015 00:47 IST

जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर व मोहाडी नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून नगराध्यक्षपदासाठी ३० नोव्हेंबरला निवडणूक होत आहे.

नगराध्यक्षपदाची निवडणूक ३० रोजी : सदस्य तीर्थस्थळीचभंडारा : जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर व मोहाडी नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून नगराध्यक्षपदासाठी ३० नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी नामांकन दाखल करण्यात आले. यात लाखनी येथून तीन, लाखांदूर दोन तर मोहाडी येथे एकाच उमेदवारांने नामांकन दाखल केले आहे.लाखनी : १७ सदस्यीय लाखनी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी आज सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ३ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.काँग्रेसतर्फे कल्पना भिवगडे यांनी नामांकन दाखल केले. त्यांचे सुचक अनुमोदक धनंजय तिरपुडे व अनिल निर्वाण आहेत. भाजपातर्फे ज्योति निखाडे यांनी अर्ज दाखल केला. त्यांचे सुचक अनुमोदक महेश आकरे व माया निंबेकर आहेत. लाखनी विकास मंच आघाडीतर्फे अपक्ष उमेदवार सुशिला भिवगडे यांनी अर्ज दाखल केले. त्यांचे सुचक व अनुमोदक विक्रम शेंडे व साधना वंजारी आहेत. लाखनी नगरपंचायतचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाकरिता राखीव आहे.लांखादूर : नगराध्यक्ष पदाकरिता भाजपा उमेदवार निलम विलास हुमणे तर काँग्रेसकडून निलीमा सतीश टेंभुर्णे यांना अर्ज निवडणूक अधिकारी जी. जी. जोशी यांचेकडे नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार विजय पवार उपस्थित होते. १७ प्रभाग असलेल्या नगरपंचायतमध्ये भाजपा ११, काँग्रेस ५, राष्ट्रवादी १ तर असे उमेदवार निवडुन आले होते. ३० नोव्हेंबरला अध्यक्ष पदाची व उपाध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला.मोहाडी : १७ सदस्यीय मोहाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वाती निमजे यांनी नामांकन अर्ज दाखल केला. भाजपच्या वतीने मनीषा साठवणे या नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता पाच मिनीट उशिरा पोहचल्याने त्यांचा अर्ज स्विकारण्यात आला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या स्वाती निमजे यांचा एकमेव अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्याकडे प्राप्त झाला असून त्यांच्या विजयांची औपचारिकता शिल्लक आहे. (तालुका प्रतिनिधी)