शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

गोसीखुर्दचे आणखी सहा दरवाजे उघडले

By admin | Updated: June 24, 2015 01:01 IST

मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गोसीखुर्द धरणातील पाण्याची पातळी वाढली होती.

जलसाठ्यात स्थिरतेचा प्रयत्न : अर्धा मीटरने दरवाजे उघडलेभंडारा : मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गोसीखुर्द धरणातील पाण्याची पातळी वाढली होती. ती स्थिर ठेवण्यासाठी धरणाचे काल १९ दरवाजे अर्ध्या मिटरने उघडण्यात आले होते. आज दुपारपर्यंत आणखी सहा दरवाजे उघडून धरणातील ८७ हजार २६३ क्युसेस पाणी विसर्ग करण्यात आले. जिल्ह्यातील महत्वकांक्षी धरण म्हणून सर्व परिचित गोसेखुर्द धरणाचा आजचा जलसाठा पातळी २४०.७० मीटर आहे. धरणाचा अपेक्षित जलसाठा ११४६.०६ दलघमी आहे. त्या तुलनेत आज ४२३.१६ दलघमी उपयुक्त साठा आहे. धरणात असलेल्या जलसाठ्याची टक्केवारी ३६.९२ असून २३५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरणात आवश्यक असलेल्या जलसाठ्यापेक्षा दोन दिवसाच्या पावसामुळे त्यात वाढ झाली. धरणाचा जलस्तर वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने काल धरणाचे १९ वक्रद्वार अर्ध्या मिटरने उघडले होते. रात्रीपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या जलसाठ्याच्या पातळीत वाढ होणार असल्याचे लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा आणखी सहा असे २५ वक्रद्वार अर्ध्या मिटरने उघडले होते. यातून ८७ हजार २६३ क्युसेस पाणी विसर्ग करण्यात आले. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जलस्तर स्थिर होण्याच्या पातळीपर्यंत सहा दरवाजे बंद करण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत गोसेच्या १९ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू होता. (शहर प्रतिनिधी)पुढील चार दिवस पाऊस नाही२४ तासापासून सुरू असलेला पावसाने आज पुर्णपणे उसंत घेतली. दिवसभर सुर्यप्रकाश होता. पुढील चार दिवसपर्यंत पाऊस पडणार नसल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे, असे असले तरी मध्यप्रदेशात पाऊस पडल्यास तेथील पुजारीटोला, कालीसराड व संजय सरोवर येथील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्यास पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. यावेळी नदीकाठावरील नागरिकांना धोका पोहचू शकतो. अशा स्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. परिस्थिती पूर्वपदावरदोन दिवसात झालेल्या पावसामुळे गणेशपूरलगतचा कोरंभी मार्गावरील नाला दुथडी भरून वाहत असल्याने काल हा मार्ग बंद होता. काल दुपारपासून पाऊस बंद झाल्याने आज नाल्यावरून रहदारी सुरू झाली. यासोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले आहे.तीन तालुक्यात अतिवृष्टीदोन दिवसाच्या निरंतर पावसाची तीन तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यात ११० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्या खालोखात ७७.८ मि.मी. पाऊस साकोली तालुक्यात पडला आहे. तर भंडारा तालुक्यात ७०.१ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.