जिल्ह्यात एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 05:00 AM2020-06-11T05:00:00+5:302020-06-11T05:00:53+5:30

सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४८ वर पोहचली आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात लाखांदूर तालुक्यातील तीन, लाखनी तालुक्यातील दोन तर भंडारा तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. लाखनी तालुक्यात चेन्नई येथून ३६ वर्षीय व ४२ वर्षीय दोन पुुरुष ४ जून रोजी आले होते. दोन्ही व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते.

Six corona positives on the same day in the district | जिल्ह्यात एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देसहा व्यक्ती कोरोनामुक्त : एकुण संख्या ४८, क्रियाशिल रुग्ण १६

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याची संख्या वाढत असतानाच तेवढीच रुग्णांचीही संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. बुधवारी जिल्ह्यात एकाच दिवशी सहा व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर सहा व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. तर कोरोनाबाधितांची संख्या ४८ वर पोहचली असून आतापर्यंत ३२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली तर १६ क्रियाशिल रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
भंडारा जिल्हा सुरुवातीला कोरोनामुक्त होता. मात्र त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होत गेली. सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४८ वर पोहचली आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात लाखांदूर तालुक्यातील तीन, लाखनी तालुक्यातील दोन तर भंडारा तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. लाखनी तालुक्यात चेन्नई येथून ३६ वर्षीय व ४२ वर्षीय दोन पुुरुष ४ जून रोजी आले होते. दोन्ही व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे घशाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता बुधवारी दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह आले. तर दिल्ली येथून २६ वर्षीय तरुण भंडारा तालुक्यात २ जून रोजी आला. त्याचा अहवालही बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. लाखांदूर तालुक्यात १३ मे रोजी एक २० वर्षीय तरुण आणि १४ मे रोजी एक व्यक्ती औरंगाबाद येथून तर १८ मे रोजी २६ वर्षीय तरुण उत्तर प्रदेशातून लाखांदूर तालुक्यात आले होते. त्यांच्या घशाचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविले असता सदर तिनही व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भंडारा जिल्ह्यात २ जून रोजी ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यापूर्वी २८ मे रोजी ५ व्यक्ती पॉझिटिव्ह आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी पॉझिटिव्ह रुग्ण येत असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पॉझिटिव्ह निघणारे बहुतांश व्यक्ती महानगरातून आलेले
भंडारा जिल्हा सुरुवातीला कोरोनामुक्त होता. मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर अनेकजण महनगरातून भंडारा जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यात ४८ रुग्णांपैकी बहुतांश व्यक्ती हे महानगरातून आलेले आहेत. अनेक जण मुंबई-पुणे, चेन्नई, उत्तरप्रदेश यासह राज्याच्या विविध भागातून आलेले आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाने सदर व्यक्ती दाखल होताच त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या नगण्य आहे. जिल्हा प्रशासनाचा बाहेरुन येणाºया व्यक्तींवर वॉच आहे.

२४५४ अहवाल निगेटिव्ह
जिल्ह्यातून आतापर्यंत २५०७ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर २४५४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पाच नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. बुधवार १० जून रोजी आयसोलेशन वॉर्डात १८ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ३७५ व्यक्तींना येथून सुटी देण्यात आली. साकोली, तुमसर व मोहाडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये २४१ व्यक्ती दाखल असून १८९० व्यक्तींना सुटी देण्यात आली. मुंबई, पुणे व इतर राज्यातून ४१ हजार ५३ व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून ३१ हजार ३१६ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणावरून आलेल् या ९ हजार ७३७ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. २८ दिवस या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये.

स्वत:हून माहिती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
भंडारा शहरासह जिल्ह्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद व इतर महानगरातून येणाºया सर्व नागरिकांनी स्वत:हून स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी, तसेच साथरोग नियंत्रण कक्षाला फोनद्वारे कळवावे असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे. आरोग्य विभागामार्फत स्थानिक इंडीयन मेडीकल असोसिएशनशी समन्वय साधला जात आहे. स्थानिक सर्व खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे आलेल्या संशयीत रुग्णाबाबत माहिती दैनंदिन स्वरुपात साथरोग नियंत्रण कक्षात सादर करावी असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व विभागांना कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

साकोलीत सर्वाधिक
जिल्ह्यात ४८ कोरोनाबाधीत रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली असून सर्वाधिक साकोली तालुक्यात १९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल लाखांदुरमध्ये - १४, भंडारा - ६, पवनी - ४, लाखनी - ३ आणि तुमसर व मोहाडीत प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Six corona positives on the same day in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.