साहेब, तुम्हीच शेती करा, नाही तर मोबदला द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:00 AM2020-07-15T05:00:00+5:302020-07-15T05:01:03+5:30

विशाल रणदिवे । लोकमत न्यूज नेटवर्क अड्याळ : येथील शेतकऱ्यांची बियाण्यांच्या बाबतीत फसवणूक झाली. तक्रारीनंतर क्षेत्रीय चौकशी समितीने पाहणी ...

Sir, you farm yourself, if not, pay! | साहेब, तुम्हीच शेती करा, नाही तर मोबदला द्या !

साहेब, तुम्हीच शेती करा, नाही तर मोबदला द्या !

Next
ठळक मुद्देशेतकरी त्रस्त-बियाणे कंपनी बिनधास्त : चौकशी समितीच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे लक्ष




विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : येथील शेतकऱ्यांची बियाण्यांच्या बाबतीत फसवणूक झाली. तक्रारीनंतर क्षेत्रीय चौकशी समितीने पाहणी केली. धान्य बियाणे कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी यांनी पत्रव्यवहार करून सुध्दा तब्बल चार तास उशिरा चौकशी स्थळावर उपस्थित झाले. यावेळी शेतकºयांनी समितीला एकच उत्तर दिले, ‘साहेब तुम्हीच ही शेती करा नाहीतर मोबदला तरी द्या’.
आता पेरणी केलेल्या धान्य बियाणे परिपूर्ण उगवले नसल्याने शेतात परिपूर्ण रोवणी होऊ शकत नाही. आता वेळेवर भात रोप आणायचे कुठून? आता क्षेत्रीय समितीच्या अहवालाकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे. अड्याळ येथील राहुल खोब्रागडे व आनंदराव करंजेकर या शेतकºयांनी धान बिजायतमध्ये फसवणूक झाल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दाखल करताच तालुकास्तरीय चौकशी समिती शेतकºयांच्या शेतात दाखल झाली होती. यामध्ये तालुका कृषी अधिकारी ए. बी. घोगरे, कृषी अधिकारी संजय लांजेवार, वरिष्ठ भात पैदासकार डॉ. जी. आर. शामकुवर, यशोदा व आरके सिड्स कंपनी तथा कृषी केंद्र चालक यांचे प्रतिनिधी तसेच तक्रारकर्ते शेतकरी यावेळी उपस्थित होते. शेतीची यावेळी बारीक सारीक पाहणी करण्यात आली. चौकशी समितीचा अहवाल अद्याप शेतकºयांच्या हातात मिळालेला नाही. अहवाल लवकरच शेतकºयांना देण्यात येणार असल्याचे डॉ. जी. आर. शामकुवर, तालुका कृषी अधिकारी ए. बी. घोगरे यांनी सांगितले. माहितीनुसार ज्या कृषी केंद्रातून धान्य बियाणे घेतल्यानंतर या दोन शेतकºयांची फसगत झाली. अशीच फसगत अड्याळ गावातील अजून काही शेतकºयांची सुद्धा झाली होती. यात दोन शेतकºयांनी तक्रार दाखल केली तसेच शेतातील स्थिती वारंवार सांगून सुद्धा धान्य बियाणे कंपनीचे प्रतिनिधी शेतात आले नाही. कुठलीही माहिती या शेतकºयांना मिळाली नसल्याने पुन्हा अतिरिक्त बियाणे घातल्याची माहिती आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तर बसतोच पण आता निसर्गसोबतच बोगस बियाण्यांचाही शेतकºयांना फटका बसत आहे.

सरतेशेवटी शेतकºयांचीच परीक्षा
शेतकºयांना वारंवार कृषी विभाग पेरणी संदर्भात मार्गदर्शन करतो की पेरणी घरातील धान्य बियाणांचा वापर करूनच करा पण दरवर्षी पेरणी चा हंगाम लागताच शेतकºयांची गर्दी बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रात पाहायला मिळते. काही दिवसातच कुठे बियाणे उगवले नाही तर कुठे बियाणे पुर्णत: उगवले नसल्याची तक्रार शेवटी कृषी कार्यालयात दाखल होऊन पंचनामासाठी चौकशी समिती अहवाल शेतकºयांना सादर करते, यामध्ये मात्र अंतत: शेतकरीच भरडला जातो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Web Title: Sir, you farm yourself, if not, pay!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती