शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

साहेब, व्यवसाय करणे गुन्हा आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:09 IST

ऐरवी शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की, लहान मुलांचे पालक पाल्यांना नव्याने उदयास आलेल्या समर कॅम्प, संस्कार शिबिरे नाही तर कोणत्याही क्लासला तरी पाठवताना दिसतात. परंतु ज्यांच्या पालकांकडे मोठी रकम भरायला नाही अशा पालकांचे पाल्य रोजीसाठी भटकतात.

ठळक मुद्देसुटीत बालके कामाला। कुणी आंबे, खिरण्या, चारोळीची तर कुणी पत्रावळीची दुकाने थाटतात

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : ऐरवी शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की, लहान मुलांचे पालक पाल्यांना नव्याने उदयास आलेल्या समर कॅम्प, संस्कार शिबिरे नाही तर कोणत्याही क्लासला तरी पाठवताना दिसतात. परंतु ज्यांच्या पालकांकडे मोठी रकम भरायला नाही अशा पालकांचे पाल्य रोजीसाठी भटकतात. खेळण्या बाळगण्याच्या वयात ही निरागस बालके, साहेब, व्यवसाय करणे गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित करीत आहेत.भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर ज्या ज्या जंगल भागात रानमेवा उपलब्ध होतो. अशा परिसरात सुटीच्या दिवसात लहान मुले एकही रुपयाची लागत न लावता मेहनतीने पाच रुपये, दहा रुपये कमावताना दिसतात. यामुळे पालक तथा पाल्य दोन्ही चेहऱ्यावर बºयाचदा आनंद दिसतो. पण यात त्यांचे बालपण हरवित असते.एखाद्या सुशिक्षित, सुटा बुटातल्या गृहस्थाने, ग्राहकाने या विषयावर प्रश्न केला तर उत्तर एकच असते तो म्हणजे व्यवसाय करणे गुन्हा आहे का साहेब? बºयाच ठिकाणी लहान चिमुकले मुल पायात चप्पल नाही, अंगावर स्वच्छ कपडे नाहीत अशा स्थितीत रस्त्याच्या कडेला व्यवसाय करताना आढळतात. कुणी चिचबिलाई, चार, पत्रावळी तर कुणी फळाने आंबे विकत असल्याचे दिसून येते. आरोग्याबबतही जागरूकता असत नाही. अशात त्यांना आजाराने ग्रासले याचा भूर्दंडही सहन करावा लागत असतो.आजही समाजात, वडिलांनी कमावले अन् मुलाने गमावले, अशी बरीच उदाहरण आहेत. मुलाला लाखो रुपये खर्च करून एखादी लहान मोठा व्यवसाय लावून दिला तरी तो वाममार्गाचा आहारी जातो. परिणामी समाजात असलेली पत व प्रतिष्ठा ही लयास जाते.अशा पालकांनी करायचे तरी काय? असा सवाल आहे. जिल्ह्यात तथा देशभरात बाल कामगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आज एखाद्या गरीब घरच्या मुलाला सुरु असलेल्या शिबिरात काहीतरी नवीन शिक्षण आत्मसात करण्याची आवडही असली तरी तो तिथे पैसा व आर्थिक परिस्थितीमुळे जाऊ शकत नाही.अशा मुलांना शिबिरात मोफत शिक्षणही मिळाले तरी सुद्धा कुठे ना कुठे तरी लहान मोठ्या रकमेत पैसा लागणार, या विवंचनेत ते जात नाहीत.कदाचित या भावनेमुळे तर लहान मुले बालकामगार होत नसणार? ज्याला दात आहे त्याकडे चणे नाहीत आणि ज्याकडे चणे आहेत त्याकडे दात नाही. असेही बºयाचदा समाजात, घरादारात मुलांविषयी चर्चा होताना ठिकठिकाणी ऐकायला मिळते. यामध्ये दोष कुणाचा? या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही, हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :Studentविद्यार्थी