शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अन् पाहता पाहता इसम बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 21:04 IST

वहिनीच्या निधनामुळे घरात दुख:मय वातावरणात पुन्हा दीराच्या मृत्यूने भेंडारकर परिवाराला हादरुन सोडले. तेरवीच्या दिवशी अस्थिविसर्जनासाठी आलेल्या दीराचा चुलबंद नदीपात्रात डोळ्यांसमक्ष बुडून मृत्यू झाला. रामेश्वर नारायण भेंडारकर (५५) रा.सुकळी असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देअस्थिविसर्जनासाठी आले होते नातेवाईक : कुंभली येथील चुलबंद नदी पात्रातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : वहिनीच्या निधनामुळे घरात दुख:मय वातावरणात पुन्हा दीराच्या मृत्यूने भेंडारकर परिवाराला हादरुन सोडले. तेरवीच्या दिवशी अस्थिविसर्जनासाठी आलेल्या दीराचा चुलबंद नदीपात्रात डोळ्यांसमक्ष बुडून मृत्यू झाला. रामेश्वर नारायण भेंडारकर (५५) रा.सुकळी असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.अवघ्या तेरा दिवसापूर्वी रामेश्वर यांची वहिनी शोभा भेंडारकर (५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शोभाबाई यांची तेरवी होती. त्यामुळे भेंडारकर कुटुंबीय गुरूवारी अस्थि विसर्जनासाठी कुंभली येथील दुर्गाबाई डोह येथे आले होते. अस्थिविसर्जन झाल्यानंतर सर्वजन आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले.पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीत पाण्याचा प्रवाह जास्त आहे. त्यामुळे रामेश्वर यांना पाण्याचा अंदाज आला नाही. अशातच डोळ्यांसमक्ष खोल पाण्यात रामेश्वरचा बुडून करूण अंत झाला.घटनेची माहिती तात्काळ साकोली पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाली. मासेमारांच्या सहायाने रामेश्वरचे प्रेत नदीबाहेर काढण्यात आले. शवविच्छेनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.तेराव्या दिवशी कुटुंबातील दुसरा मृत्यूभेंडारकर कुटुंबात तेरा दिवसांपूर्वी शोभाताईचा मृत्यू झाले. तर त्यांच्या तेरवीच्या दिवशीच दीराच्या मृत्यूने भेंडारकर कुटुंबच नाही तर संपूर्ण सुकळीवासीयात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूriverनदी