शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

झाडीपट्टीचे काश्मीर उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:45 AM

वनसंपत्ती, वन्यजीव आणि ऐतिहासिक स्थळांनी संपन्न असलेला भंडारा जिल्हा म्हणजे झाटीपट्टीचे काश्मिर होय. या परिसराला एकदा भेट दिल्यानंतर कुणीही झाडीपट्टीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. मात्र पुरेशा सोयी सुविधा आणि देखभाल दुरुस्तीऐवजी झाडीपट्टीचे काश्मिर आज उपेक्षित झाले आहे.

ठळक मुद्देपर्यटनाची मोठी संधी। भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वनसंपत्ती, वन्यजीव आणि ऐतिहासिक स्थळांनी संपन्न असलेला भंडारा जिल्हा म्हणजे झाटीपट्टीचे काश्मिर होय. या परिसराला एकदा भेट दिल्यानंतर कुणीही झाडीपट्टीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. मात्र पुरेशा सोयी सुविधा आणि देखभाल दुरुस्तीऐवजी झाडीपट्टीचे काश्मिर आज उपेक्षित झाले आहे.भंडारा हा जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीत श्रीमंत असा जिल्हा आहे. पूर्वी या प्रदेशाला गोंडवण म्हणत. आता त्याला झाडीपट्टी म्हणून संबोधले जाते. वैनगंगेच्या तिरावर वसलेल्या या जिल्ह्याला साहित्य आणि संस्कृतीचा अनमोल ठेवा लाभला आहे. निसर्ग समृद्धीने नटलेला भंडारा जिल्हा विविधतनेमुळे मोहक आणि वैभवसंपन्न आहे. झाडीपट्टीचा परिसर अतिशय विलोभनीय आणि मनाला भुरळ घालणारा आहे. प्रांतगंगा म्हणून या प्रदेशाची ओळख असून आंभोरा येथे मराठीतील आद्यग्रंथ विवेकसिंधू ग्रंथाची निर्मिती झाली. या ग्रंथाचे रचयिता आद्यकवी मुकुंदराज यांचे येथे वास्तव्य होते. वैनगंगा व इतर लहान मोठ्या नऊ नद्या आपल्या कुशीत वसवून उत्तरेस डोंगराळ सातपुडा पर्वतमाला आहे. त्यात गायमुख, चांदपूर, गायगुरी डोंगराचा समावेश आहे. उत्तरेकडील उंचवट्याचा प्रदेश सातपुडा पर्वतरांगेत भिवसेन, कोका टेकड्या आहेत.आपल्या नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण अशा शांत, रमणीय, ऐतिहासीक तिर्थक्षेत्र म्हणून हा प्रदेश प्रसिद्ध आहे. झाडीपट्टीचे काश्मिर आणि महाराष्ट्राचे स्पेन म्हणून ही भूमी ओळखली जाते. सातपुड्याची हिरवीगार किमया, घनदाट वनश्रीचा गालिचा, खळखळणाऱ्या नद्या, निसर्गरम्य जलाशय, किल्ले, प्राचीन व ऐतिहासिक वास्तू, वन्यप्राणी आणि जैववैविधता येथे मुबलक आहेत. त्यामुळेच भंडारा जिल्हा पर्यटन चक्रवर्ती सिद्ध होऊ शकतो. परंतु सध्या शासन आणि प्रशासनाचे जिल्ह्याच्या पर्यटनाकडे मोठे दुर्लक्ष झाले आहे.भंडारा जिल्ह्यात गोंड राजे बख्तबुलंदशाह द्वारे निर्मित सुंदर व वास्तूशिल्पांचा ऐतिहासिक आंबागड किल्ला, सानगडी, पवनी, प्रतापगड, भंडारा येथील किल्ले प्राचीन इतिहासाची साक्ष देत आहे. विदर्भाची काशी म्हणून पवनी प्रसिद्ध आहे. अड्याळ येथील हनुमान मंदिर, भंडाराचे भ्रृशुंड गणेश मंदिर, प्रतापगडचे मंदिर व दरगा, माडगी येथील नृसिंह टेकडी, कोका अभयारण्य, चांदपूर, आंभोरा, कोरंभी, पांडे महल, रावणवाडी जलाशय, बंदरझिरा, नागझिरा, हत्तीडोई, गोसेखुर्द धरण असे एक ना अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. परंतु आजही येथे सुविधा नसल्याने पर्यटक पाठ फिरवितात. जाणीवपूर्वक प्रयत्न करून पर्यटकांना येथे आणले तर रोजगाराची मोठी संधी जिल्ह्यात निर्माण होऊ शकते.तांदळाची पेठभंडारा हा जिल्हा संपूर्ण राज्यात तांदळाची पेठ म्हणून ओळखली जाते. येथील शेतकरी भाताचे मुख्य पीक घेतात. सर्वाधिक तलावांचा जिल्हा म्हणूही भंडाराची ओळख आहे. या जिल्ह्याला आद्यकवी मुकुंदराज, महानुभावाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांचा पावनचरण स्पर्श झाला आहे. सम्राट अशोक, राजे बख्त बुलंदशाह, राजे रघुजी भोसले, पवन राजा यासारख्या शूरविरांच्या शौर्याचा व पराक्रमाचा हा जिल्हा आहे.शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीचा जिल्ह्याचा मोठा लौकीक आहे. झाडाझुडपांची बोली म्हणजेच झाडीबोली. साकोली परिसर झाडीबोलीचे प्रमुख केंद्र होय. नाटक, दंढार, तमाशा, भारुड असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. अशा या सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळाचा मेळ घालणे गरजेचे आहे.-मो.सईद शेख, पर्यटन अभ्यासक

टॅग्स :Natureनिसर्ग