शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रेती तस्करांनी पोखरले बावनथडी नदीपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 05:00 IST

तुमसर तालुक्यात बावनथडी नदीचे पात्र सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर लांब असून, मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. यात चांदमारा, आष्टी, चिखली, देवनारा, लोभी, पाथरी या रेती घाटांचा समावेश आहे. यापैकी राज्य शासनाने एकाही रेती घाटाचा लिलाव  दीड वर्षापासून केला नाही. परंतु, राजरोसपणे या रेती घटातून रेतीचा अवैध उपसा सुरू आहे.  संघटनात्मक पद्धतीने रेतीची सर्रास चोरी सुरू आहे. यापूर्वी या रेती घाटांचा लाखो रुपयांत रेती घाट लिलाव करण्यात आले होते.  

ठळक मुद्देआठ घाटांचा समावेश : संरक्षणाची जबाबदारी कुणाची?

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरराज्य बावनथडी  नदीवरील आठ रेती घाट  रेती तस्करांचे पोखरणे सुरू आहे. नदीपात्राच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न पडत आहे. लाखोंचा महसूल तर बुडत आहे. सोबतच नदीच्या अस्तित्वाला व पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटांचीही अशीच स्थिती आहे.तुमसर तालुक्यात बावनथडी नदीचे पात्र सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर लांब असून, मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. यात चांदमारा, आष्टी, चिखली, देवनारा, लोभी, पाथरी या रेती घाटांचा समावेश आहे. यापैकी राज्य शासनाने एकाही रेती घाटाचा लिलाव  दीड वर्षापासून केला नाही. परंतु, राजरोसपणे या रेती घटातून रेतीचा अवैध उपसा सुरू आहे.  संघटनात्मक पद्धतीने रेतीची सर्रास चोरी सुरू आहे. यापूर्वी या रेती घाटांचा लाखो रुपयांत रेती घाट लिलाव करण्यात आले होते.  मध्यप्रदेशातून उगम पावणाऱ्या बावनथडीचे पात्र विस्तीर्ण आहे. या नदीपात्रात उच्च गुणवत्तेची रेती उपलब्ध आहे. बेसुमार रेती उपशामुळे अनेक ठिकाणी झुडपी वनस्पती उगवली आहे. नदीपात्रात सर्वत्र खड्डेच खड्डे दृष्टीस पडतात. मध्यप्रदेश शासनाने या नदीपात्रातील अनेक घटांचे लिलाव केले आहे. महाराष्ट्र शासनाने लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली नाही. परंतु, रेती चोरी मात्र सर्रास सुरू आहे. तालुक्याची सीमा नागपूर जिल्ह्याला लागून आहे. लेंडेझरी मार्गाने थेट हिवरा बाजार, रामटेक येथे हा रस्ता जातो. चोरीची रेती याच मार्गाने वाहतूक सुरू असल्याची माहिती आहे. महसूल आणि पोलिस मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे.

कोतवाल,  तलाठ्याकडे संरक्षणाची जबाबदारी- रेती चोरी होऊ नये त्यासाठी रेती घाट संरक्षणाची जबाबदारी स्थानिक कोतवाल व तलाठ्याकडे सोपविण्यात आली आहे. परंतु, कोरोना संक्रमण काळात कोतवाल व तलाठ्यांना विविध कामे करायची आहेत. एका तलाठ्याकडे दोन ते तीन गावांचा प्रभार आहे. त्यातच त्यांना माहिती गोळा करणे, त्याची ऑनलाइन माहिती शासनाला पाठविणे आदी कामे करावी लागतात. त्यामुळे रेती घाटांचे संरक्षण करण्याकरिता त्यांनाही मर्यादा येथे येत आहे.पर्यावरणाची हानी- रेती घाट लिलाव करत असताना खनिकर्म विभाग व महसूल विभाग पर्यावरणाची हानी होणार नाही, या दृष्टिकोनातून अहवाल मागवून त्यानंतर लिलाव करण्यात येतो. नियमानुसार पर्यावरणाची हानी होऊ नये, हा येथे नियम आहे. दुसरीकडे रेती तस्करांचे  मात्र येथे राजरोसपणे संपूर्ण नदीपात्र  पोखरणे सर्रास सुरूच आहे. यामुळे पर्यावरणाची येथे मोठी हानी होत आहे. बावनथडी नदीवर धरण बांधले असल्याने  वर्षातून किमान नऊ महिने ही नदी कोरडी राहते. त्या कारणामुळे रेती तस्करांचे येथे चांगभले होते.

 

टॅग्स :sandवाळूriverनदी