शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

‘शिवभोजन’ ने मिटविली विस्थापित मजुरांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

२७ मार्च २०२० पासुन भंडारा जिल्ह्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे पुर्ववत शिवभोजन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन काळात कामगार, बेघर, विस्थापित व भिकारी यांच्या भोजनाची व्यवस्था करायची होती. पण याकरिता लागणारे मनुष्यबळ उपस्थित राहील की नाही असा प्रश्न महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रदीप काठोळे यांच्या समोर होताच.

ठळक मुद्दे१०२२ थाळी मोफत : माविम व केंद्र चालकांचा असाही सेवाभाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनच्या काळात कामगार, बेघर व भिकारी व्यक्तींना खरा आधार मिळाला तो शासनाने सुरू केलेल्या निवारागृहाचा व शिवभोजन थाळीचा. कठीण परिस्थितीतही महिला आर्थिक विकास महामंडळाने विस्थापित व गरजू नागरीकांना त्यांच्यापर्यंत मोफत शिवभोजन थाळी पोहचवून सेवेचा आदर्श समाजासमोर ठेवला. मागील ९ दिवसात शिवभोजन केंद्रात ५५७, शासकीय वसतिगृहात ४६५ अशा १०२२ थाळी भोजन अगदी विनामूल्य दिले. यासाठी येणारा खर्च माविम अदा करणार आहे. अडचणीच्या काळात शिवभोजन थाळीने आधार दिला, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. आणि हे सगळं सोशल डिस्टन्सिंग पाळून करण्यात आलं.२७ मार्च २०२० पासुन भंडारा जिल्ह्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे पुर्ववत शिवभोजन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.लॉकडाऊन काळात कामगार, बेघर, विस्थापित व भिकारी यांच्या भोजनाची व्यवस्था करायची होती. पण याकरिता लागणारे मनुष्यबळ उपस्थित राहील की नाही असा प्रश्न महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रदीप काठोळे यांच्या समोर होताच.भंडारा येथील शिवभोजन केंद्र 'नवप्रभा' लोकसंचलित साधन केंद्र भंडारा यांच्या माध्यमातुन चालविल्या जाते.व्यवस्थापक रंजना खोब्रागडे यांना आधिच मधुमेह हा आजार. पण त्यांनी सांगीतले काळजी नसावी मी बघते. अशा परिस्थितीत घरुन परवानगी मिळणार नाही ही माहिती होतीच. तरी त्यांनी होकार दिला. आणि सेवा कायार्चा प्रारंभ झाला. स्वयंपाक करणारे व व्यवस्थापन करणाऱ्या सरिता मेश्राम, सुनंदा मेश्राम, मोहन शेंडे, कुमार वैद्य यांची खरी दाद दिली पाहिजे. त्यांनीही यासाठी आपली तयारी दाखवली. मनात कोणतीही भिती नाही, जनसेवा हीच खरी सेवा हा पक्का निर्धार. कॅटिंग स्वच्छता, चवदार भोजन, येणाºयाचा आदर हा सेवाभाव एरवी दुर्मिळच. शिवभोजन केंद्रात वेळेवर पोहोचणे, जेवण तयार करणे हे लॉकडाऊनच्या काळात थोड कठीणच होत. पण घेतलेला वसा सोडायचा नाही या भावनेतून ही माणस सेवाकार्य करत आहेत. अत्यंत गरिब व अडचणीत सापडलेल्या लोकांच्या उदरनिवार्हाची व्यवस्था ही मंडळी करीत आहे. रंजना खोब्रागडे या जरी येऊ शकत नसल्या तरी घरून उत्तम व्यवस्थापन त्या करत आहेत. समाजसेवा म्हणजे आणखी असत काय.त्यांची लाभतेय अहोरात्र सेवाप्रशासन व पोलीस गरीब गरजूंना केंद्रात पाठवत आहेत. येणाऱ्यांचा ओघ असतोच अशा वेळी त्यांचा विश्वास राखणे हे सुद्धा आलेच. या काळात ही जबाबदारी कोणाला द्यावी हा प्रश्न होताच. पण या केंद्रचे व्यस्थापन पाहण्याकरिता एनयूएलएमचे क्षेत्रीय समन्वयक मनोज केवट यांनी ही जबाबदारी स्वीकारली. पवनी क्षेत्रीय समन्वयक ललीता कुंडलकर यांनी सतत ४ दिवस आपली सेवा दिली. लेखापाल रोशन साकुरे, रत्नमाला मेश्राम, महेंद्र गिल्लोरकर या कठीण काळात २४ तास सेवा देत आहेत.लॉकडाऊनमध्ये कामगार, बेघर व भिकारी यांच्या उदरनिवार्हाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शासनाने शिवभोजन केंद्र पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय केला व ५ रुपये थाळी दर ठेवला. मात्र भंडारा जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने गरजूंना शिवभोजन थाळी अगदी मोफत देण्यात येत आहे. निवारागृहात असलेल्या नागरिकांना सुद्धा शिवभोजन पुरविण्यात येते. हे सगळं सोशल डिस्टन्सिंग पाळून केल्या जाते. माविमने १०२२ लोकांना पुरविलेल्या शिवभोजनमूळे अनेक गरीबांच्या जेवणाचा प्रश्न सुटला आहे.- प्रदिप काठोळे, व्यवस्थापक माविम, भंडारा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshiv bhojnalayaशिवभोजनालय