शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

प्रतीक्षा निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला

By admin | Updated: May 8, 2014 23:32 IST

मोहाडी : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला केवळ एक आठवडा शिल्लक आहे. कोण निवडून येणार, कुणाला पराभव पत्करावा लागणार, विदर्भासह राज्यात आणि देशात कोण किती जागा घेणार,

पाच लाखांपर्यंतच्या शर्यती

मोहाडी : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला केवळ एक आठवडा शिल्लक आहे. कोण निवडून येणार, कुणाला पराभव पत्करावा लागणार, विदर्भासह राज्यात आणि देशात कोण किती जागा घेणार, कोणत्या पक्षाची सत्ता येणार याविषयी सर्वांनाच कमालिची उत्सुकता लागली आहे. या उत्सुकतेतूनच हजारांपासून लाखांपर्यंत तर एक कप चहापासून तर जेवनापर्यंत अनेकांनी शर्यती लावलेल्या आहेत. गाव-खेड्यापासून ते शहरापर्यंत चार-चौघांच्या बैठकीत चर्चा सुरु असते ती निवडणूक निकालाची. सगळ्यांनाच प्रतिक्षा लागली आहे, १६ मे च्या सकाळची. तथापि, मतदान झाल्यापासून भंडार्‍यातून ‘भाई’ येणार की ‘भाऊ’ येणार हीच चर्चा गावागावात होताना दिसत आहे. सगळेच आपापल्यापरीने अंदाज वर्तवित आहेत. बेरीज-वजाबाकी लाखावरुन हजारावर येणार असल्याचे काहींचे म्हणने आहे तर काहींना परिवर्तन होणार असे चर्चेतून दिसून आले आहे.

याशिवाय प्रमुख उमेदवाराची मते कोण किती काटणार याचाही हिशेब आकडेवारीसह सांगत आहेत. चर्चा, हिशेब, अंदाज वर्तविणे सुरु असते आणि त्यातूनच पुढे सरसावतात शर्यती लावण्यासाठी. त्यातच चढविणारे अनेक असल्यामुळे या शर्यतीचा आकडा वाढत जात आहे. शहरात लाखोच्या शर्यती सुरू आहेत तर ग्रामीण भागात कुवतीनुसार शर्यती लावणे सुरु आहे. खेड्यातही आर्थिक सुबत्तेने मजबूत असलेले व्यक्ती लाखांच्या शर्यती घेत आहेत. ज्यांच्याकडे काही नाही असे हजार, पाचशेवर समाधान मानत आहेत. पाच रुपयाची चहासुद्धा शर्यतीचा हिस्सा झाली आहे. शर्यत केवळ मतदारसंघाची मोठ्या प्रमाणात लावली जात आहे, असे नाही. देशात कोणाला किती जागा मिळतील, कोणता पक्ष सत्तेत येईल, कोण पडणार, कोण जिंकणार अशा देश पातळीवरील प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या उमेदवाराची चर्चा गावखेड्यात होत आहे. सत्ता परिवर्तन झाले तर येणारा पक्ष सामान्यांचे हित जोपासणार काय याचीही चिंता अनेकांना वाटू लागली आहे. काही ठिकाणी सफारी शिवून देण्याची शर्यती लागलेल्या आहेत. काही ठिकाणी दुचाकीच्या तर काही ठिकाणी म्हणशील त्या हॉटेलमध्ये भोजन करायला नेईन, अशा शर्यतींचाही समावेश आहे. विधानसभेच्या चर्चांना उधाण शर्यती आणि चर्चा यापलिकडे एक चर्चा सुरु आहे ती येणार्‍या विधानसभा निवडणुकीची. टिक-टिक थांबली तर कोणाला उमेदवारी दिली जाईल. अन् फुल कोमेजला तर कसं होणार, याची चिंताही मतदारांना वाटू लागली आहे. याला तिकीट मिळेल, याची उमेदवारी कापली जाणार, या मतदारसंघात सर्वाधिक समाज आहे, त्यालाच तिकीट मिळेल, असे तर्कवितर्क लावणे सुरू आहे. एक आठवडा निवडणुकीच्या निकालाला उरल्यामुळे तेवढ्याच गतीने चर्चा, चहापानाच्या बैठकी अधिकच रंगू लागल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)