शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

बालकामगारांसाठी सात संक्रमण शाळा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

बालकामगारांना पकडणे व त्यांना शाळेत टाकून मोकळे होण्याचे काम अनेक जिल्ह्यात होत असते. परंतु गोंदिया जिल्ह्याने बालकामगारांसंदर्भात नेहमी चांगली भावना ठेवून त्यांना यशस्वी नागरिक घडविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे.

ठळक मुद्देडिसेंबरच्या सर्वेक्षणात ५६६ प्रतिष्ठानांना भेटी : ७०० पैकी २११ बालकामगार धरले गृहीत

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणे, नदीतील रेतीतून सोने शोधणाऱ्या, रेल्वेत काम भीक मागणाºया, मांगगारूडी, पेंढारी व शाळाबाह्य बाल मजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना बालसंक्रमण शाळांमध्ये टाकले जाते. गोंदिया जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात ७०० बालमजूर शोधण्यात आले. परंतु शोधण्यात आलेल्या या बालमजुरांना शिक्षण विभागाने स्पष्ट नकार दिला. त्यावर पुन्हा शिक्षण विभागाने ७०० पैकी २११ जणांना बालकामगार असल्याचे गृहीत धरले. या बालकांच्या शिक्षणासाठी जिल्ह्यात सात बालसंक्रमण शाळा सुरू होणार आहेत.बालकामगारांना पकडणे व त्यांना शाळेत टाकून मोकळे होण्याचे काम अनेक जिल्ह्यात होत असते. परंतु गोंदिया जिल्ह्याने बालकामगारांसंदर्भात नेहमी चांगली भावना ठेवून त्यांना यशस्वी नागरिक घडविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे.जिल्ह्यात पाच ते १० हजाराच्या घरात बालमजूर असले तरी शासनाकडे त्यांची नोंद आता २११ आहे. या बालमजुरांसाठी गोंदिया शहराच्या सुंदरनगर, छोटा गोंदिया, रामनगर, गौतमनगर, अदासी, काचेवानी व मुंडीकोटा या सात ठिकाणी बालमजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बालसंक्रमण शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची प्रभावीपणे अमंलबजावणी सुरू केली. गरीब मुलांना गरिबीमुळे काम केल्याशिवाय पर्याय उरत नसल्यामुळे त्यांचे शिक्षण बुडते. त्यांनाही शाळेत जाता यावे म्हणून बाल संक्रमण शाळा सुरू करण्यात आल्या होत्या.परंतु केंद्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे बालकामागारांना नियमित शाळेत दाखल केल्यामुळे जिल्ह्यातील १६ बाल संक्रमण शाळा सद्यस्थितीत बंद झाल्या आहेत.बालकामगार निर्माण होण्यास अज्ञान, अशिक्षितपणा, व्यसन, दारिद्र्य कारणीभूत असते. घरात खाणारी वाढती तोंडे व पालकांच्या व्यसनामुळे स्वत: मुलांना घर चालवण्यासाठी अर्थार्जन करावे लागते. काही मुले घरी चालू असलेले काम म्हणजेच लोहारकाम, सोनारकाम, शेती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आदी पारंपारीक व्यवसाय करतात.ज्या उद्योग व व्यवसायांमध्ये बालमजुरांची संख्या जास्त आहे. त्या ठिकाणच्या बालकामगारांना कामापासून परावृत्त करु न त्यांचे योग्य पध्दतीने शैक्षणिक पुनर्वसन घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यांची पिळवणूक थांबवून हरविलेले बालपण त्यांना मिळवून दिले पाहिजे.शिक्षण विभाग म्हणते ते ४८९ आपले विद्यार्थीकामगार कार्यालय, पोलीस यंत्रणा व शिक्षण विभागाने डिसेंबर २०१९ मध्ये सतत पाच दिवस जिल्हाभरात केलेल्या सर्वेक्षणात शाळेत न जाणारी, वीटभट्टीवर काम करणारी, कचरा गोळा करणारी, भीक मागणारी अशी ७०० बालके पाच दिवसात शोधून काढली होती. परंतु शिक्षण विभागानेही यापूर्वी अनेकदा शाळाबाह्य मूल ही संकल्पना राबवून शाळाबाह्य असलेल्या बालकांना शाळेत दाखल केले होते. डिसेंबरच्या सर्वेक्षणात आढळलेल्या ७०० पैकी ४८९ बालके ही बालकामगार नसून आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत असे शिक्षण विभागाने सांगितले आहेत. त्या ७०० पैकी २११ बालकामगार आहे असे शिक्षण विभाग म्हणते. परंतु शिक्षण विभागाने जे ४८९ बालकामगार आपले विद्यार्थी आहेत असे सांगितले. त्यांचे नाव शाळेत दाखल आहेत मात्र शाळेत जात नव्हते हे वास्तव पुढे आले आहे.

टॅग्स :Schoolशाळा