लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : बांधकामाकरिता रेती अत्यंत महत्वाची आहे. जिल्ह्यातील रेती घाट लिलावात नसल्याने रेती अत्यंत महत्वाची आहे. जिल्ह्यातील रेती घाट लिलावात नसल्याने रेती तस्कर सुसाट आहेत. दिवसरात्र रेती तस्करीने चुलबंद पात्र धोक्यात आले आहेत. जिल्ह्यातील गौण खनीज अधिकारी व महसूल अधिकारी फिरकत नसल्याने रेती तस्करांना रान मोकळे असल्याने भरधाव वेगाने मद्यपान करून ट्रॅक्टरने रेती चोरी सुरु आहे.शासकीय कार्यालयात अधिकाºयांना कामे संपत नसल्याने कार्यालयाबाहेर पडायला वेळ मिळत नसल्याची चर्चा आहे. नेमक्या अशाच संधीचे सोने करीत वाळू / रेती माफिये बेधुंदपणे रेतीची अवाढव्य भावाने रेती विकत आहेत. रेतीची मागणी अधिक तर पुरवठा कमी होत असल्याने रेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. गरीबांच्या घरकुलाला राज्यपालांच्या आदेशाने पाच ट्रॅक्टर रेती मोफत मिळण्याचे दिवास्वप्न ठरले आहे. गरीबांकरिता नियमावली तंतोतंत लावली जाते.क्षुल्लक चिरीमिरी करिता तस्करांना पाठीशी घेतले जाते. राजकारणी / लोकप्रतिनिधीसुद्धा वास्तविकतेला समजत नसल्याने गरीबांच्या घरकुलांना न्याय मिळत नाही.पालांदूर परिसरात चुलबंदचे पात्र विस्तीर्ण असल्याने रेती अमाप असून दर्जेदार असल्याने संपूर्ण जिल्ह्यात वाढती मागणी आहे. घाट लिलावात नसल्याने व बांधकाम सुरुच असल्याने रेती अत्यावश्यक झाली आहे. ही गरज पूर्ण करण्याकरिता तस्कर मोबाईल नेटवर्कचा उपयोग करून मोहीम फत्ते करीत आहेत.रस्त्याचे हाल बेहालभरधावपणे रेती वहनाने आमरस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. चोरी तात्काळ व्हावी, कुणी रस्त्यात भेटू नये या भीतीने ट्रॅक्टर चालक कमालगतीने वाहने चालवितात. उघड्या ट्रॉलीतून रेती रस्त्यावर उडते. पादचाऱ्यांना डोळ्यात जाण्याची भीतीसुद्धा असते तरीपण बिनधास्त ट्रॅक्टरने रेती वहन सुरुच आहे.जिल्हाधिकारी लक्ष देतील काय?राज्यपाल महोदयांनी गरीबांच्या घरात अपेक्षित असलेली किमान पाच ब्रास रेती पुरविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यात असलेल्या अटी शर्तीमुळे तहसील कार्यालय रेती देण्यास समर्थ नसल्याचे पुढे आले आहे. यात नेमके कुणाचे कुठे आले हे तपासून गरीबांना न्याय देता येईल काय? मानवीय संवेदनशिलता दाखवून रेती तस्करांपासून गरीबांना वाचविता येईल काय? जिल्हाधिकारी याकडे प्रामाणिकपणे लक्ष पुरवितील काय? निश्चित रकमेत घरकुल पूर्ण होईल काय? या प्रश्नाकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील काय? आदी प्रश्नांवर चावडीत चर्चा होत आहे.मोठ्या प्रयत्नांनी मऱ्हेगाव जुना नाल्यावर पुल बांधण्यात आले. या पुलामुळे मऱ्हेगाववासीयांना जीवन जगणे सोपे झाले आहे. पण आता हा पुलिया रेतीतस्करांच्या कचाट्यात सापडला असून पुलाच्या अग्रभागी मोठा खड्डा पडल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
रेती तस्करांना चुलबंदचे पात्र मोकळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 00:55 IST
बांधकामाकरिता रेती अत्यंत महत्वाची आहे. जिल्ह्यातील रेती घाट लिलावात नसल्याने रेती अत्यंत महत्वाची आहे. जिल्ह्यातील रेती घाट लिलावात नसल्याने रेती तस्कर सुसाट आहेत. दिवसरात्र रेती तस्करीने चुलबंद पात्र धोक्यात आले आहेत.
रेती तस्करांना चुलबंदचे पात्र मोकळे
ठळक मुद्देमहसूल घशात : गौण खनिज अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष