बाबा जुमदेवजी पुण्यतिथी कार्यक्रम : महादेव बुरडे यांचे प्रतिपादनकरडी (पालोरा) : सेवकांनो, आपआपसात भांडणे लावू नका, राजकारण्यांचे बुजगावणे बनून चुकीने वागू नका. सेवक हा नागपूर किंवा मोहाडी मंडळाचा असो, सर्वांचा भगवान एकच आहे. त्यांनी दिलेला मार्गही एक आहे. त्यामुळे भेदभावाचे वागणे टाळा. मार्गाबद्दल माहित आहे तेवढेच सांगा. चुकीची गोष्ट खरीच आहे म्हणून वकिली करू नका, कुणाचीही निंदा करू नका, तत्व, शब्द, नियमाने वागा असे तात्त्विक प्रतिपादन महादेव बुरडे यांनी केले.पालोरा येथे शामराव बुरडे यांचे घरी आयोजित बाबा जुमदेवजींच्या १८ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पालोरा येथील परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे वतीने मानव जागृती, धर्म रक्षण, सामाजिक विकास व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा यापासून दु:खी मानवाला मार्ग दाखविणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेव यांचा पुण्यतिथी कार्यक्रम पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंजेवाडा येथील प्रमुख कार्यकर्ता लक्ष्मण थोटे होते. मुख्य अतिथी म्हणून सरपंच माला मेश्राम, स्वस्त धान्य दुकानदार दुर्गादास वनवे, महादेव बुरडे, कार्यकर्ता सहसराम तुमसरे, भगवान तिजारे, रवी मरसकोल्हे, दुर्योधन तिजारे, प्रकाश भोयर, तानाजी राऊत, दुधराम मेश्राम, दुधराम धांडे, सुरेश शेंडे उपस्थित होते.जर परमात्म्याला जागवायचे असेल तर आपल्या आत्म्यातील हजारो वाईट विचार त्यागले पाहिजे. आकार हेच विकार असून विकास नष्ट झाले तर माणूसही भगवंत आहे असे बाबांनी सांगितले. (वार्ताहर)
सेवकांनो, कुणाचीही निंदा करु नका
By admin | Updated: October 12, 2014 23:31 IST