शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दुय्यम निबंधक कार्यालयावर गंभीर आरोप – शेतकऱ्यांच्या जमिनीची बनावट विक्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:03 IST

सामाईक जमिनीचे विक्रीपत्र प्रकरण : कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : सामाईक शेतजमिनीचे विक्रीपत्र करताना सर्व शेतकरी विक्रीपत्राच्या वेळी हजर असणे आवश्यक आहे. असे असताना तीनपैकी एका शेतकऱ्याने विक्रीपत्र करून देण्याचा प्रकार पवनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झाला. यामध्ये आर्थिक व्यवहार झाला असून दुय्यम निबंधक व इतर यामध्ये दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी आहे. 

पवनी तालुक्यातील भुयार येथील खाते क्रमांक १०३०६ गट नंबर ५७४ वर ४.४१ हे. आर. शेतजमीन नवनाथ तुळशीराम अलोने, देवीदास बळीराम अलोने, रामदास बळीराम अलोने यांची नावे ७/१२ वर आहे. या जमिनीचे खरेदी विक्री दुय्यम निबंधक कार्यालय पवनी येथे २७ मार्च २०२५ करण्यात आले. त्यामध्ये विक्री पत्रात ४.४१ हे.आर. पैकी १.४७ हे. आर. शेतजमीन रामदास बळीराम अलोने यांनी विद्या रामू सोनवणे, विशाल पंढरी सिंदूरकर यांना १५ लाख रुपये यामध्ये विक्रीपत्र करून दिले. विक्रीपत्र करताना नवनाथ तुळशीराम अलोणे व देवीदास बळीराम अलोणे यांची कोणत्याही प्रकारची सहमती दस्तावेजामध्ये घेतली नाही. 

नवनाथ अलोणे व देवीदास अलोणे यांच्या लक्षात आल्यानंतर तलाठी भुयार यांना पत्र देऊन जमिनीचा फेरफार रोखण्याची मागणी केली. परंतु त्यांनीही फेरफार रोखले नाही. आपल्याला न्याय मिळणार नाही आपली परवानगी न करता या जमिनीचे विक्रीपत्र दुय्यम निबंध कार्यालयातर्फे करण्यात आले. असे प्रकार दुय्यम निबंधक पवनी कार्यालयातर्फे अनेकदा झालेले आहे.

यापूर्वी कोंढा येथील एका विक्रीपत्रात सामाईक क्षेत्र असलेल्या शेतजमिनीची विक्रीपत्र केले असल्याचे समजते. यामध्ये गैरव्यवहार केला असल्याचे समजते. शेतजमिनीचे झालेले विक्रीपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी नवनाथ तुळशीराम अलोणे व देवीदास बळीराम अलोणे यांनी वरिष्ठांकडे केलेल्या लेखी तक्रारीत नमूद आहे.

येथे आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे विक्रीपत्र, बोजापत्र, हक्कसोड दस्ताऐवज नोंदणी केले जात नाही. दुय्यम निबंधक व येथील दलालांना मोठी रक्कम दिल्यानंतर अनेक प्रकारचे दोषपूर्ण खरेदी-विक्री केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

"दुय्यम निबंधक कार्यालय पवनी तर्फे खोटे दस्तऐवज केले जात नाही. माझ्याकडे दस्ताऐवज घेऊन कार्यालयात यावे. नंतर त्याची सविस्तर माहिती देईन."- प्रविण तोवर, दुय्यम निबंधक श्रेणी १, पवनी

टॅग्स :bhandara-acभंडारा