लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजघडीला ओबीसी समाज मागासलेला आहे. सामाजिक, आर्थिक स्थैर्य व विविध घटकांमध्ये लाभ मिळवून देण्यासाठी ओबीसींची वेगळी ओळख होणे अत्यंत आवश्यक आहे. परिणामी ओबीसींची वेगळी जनगणना करण्यासाठी केंद्र शासनाला भाग पाडावे अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. या आशयाचे निवेदन मुख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले.ओबीसी क्रांती मोर्चाने केलेल्या प्रदीर्घ लढ्याची आणि मागणीची दखल घेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ८ जानेवारीला आयोजित विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अधिकार वापरून ओबीसींची वेगळी जनगणना करण्याचा प्रस्ताव मांडून एकमताने पारित करून घेतला. यासाठी ना.छगन भुजबळ यांचेही सहकार्य लाभले.यासाठी ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक संजय मते, संयोजक सुकराम देशकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले, ना.भुजबळ यांचे आभार मानले आहेत. ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने वेळोवेळी ओबीसी वर्गाच्या न्याय व हक्कासाठी आंदोलने करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून प्रधानमंत्र्यांना निवेदनही पाठविण्यात आले होते. २६ डिसेंबरला विराट मोर्चा काढून शासनाला विचार करण्यासाठी भाग पाडण्यात आले.ओबीसींच्या समस्यांची पर्वा न करता ओबीसींच्या वेगळ्या जनगणनेशिवाय २०२१ ची जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. हा ओबीसी वर्गावर मोठा अन्याय आहे. जनगणनेसाठी छापलेल्या फार्ममध्ये तीनच रकाने आहेत. पहिला एससी, दुसरा एसटी व तिसरा इतर वर्ग अशी वर्गवारी आहे. परिणामी या जनगणनेतून ओबीसींना डावलण्याचा हेतू आहे. त्यामुळे ओबीसी वर्गाची वेगळी जनगणना करण्याचा प्रस्ताव मंजूर करून जनगणना करण्यासाठी भाग पाडावे अशी मागणीही ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
ओबीसींची वेगळी जनगणना करणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 01:22 IST
ओबीसी क्रांती मोर्चाने केलेल्या प्रदीर्घ लढ्याची आणि मागणीची दखल घेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ८ जानेवारीला आयोजित विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अधिकार वापरून ओबीसींची वेगळी जनगणना करण्याचा प्रस्ताव मांडून एकमताने पारित करून घेतला. यासाठी ना.छगन भुजबळ यांचेही सहकार्य लाभले.
ओबीसींची वेगळी जनगणना करणे आवश्यक
ठळक मुद्देओबीसी क्रांती मोर्चाचे विधानसभा अध्यक्षांना निवेदन